Pre wedding Shoot
Pre wedding ShootSaam Tv News

Agri Community: ..ही आपली संस्कृती नव्हे! यापुढे 'प्री-वेडिंग शूट' नकोच, आगरी समाजाचा निर्णय

Agri Community Bans Pre-Wedding Shoots Badlapur: पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे यापुढे कुणीही प्री वेडिंग शूट करणार नाही असा निर्णय आगरी परिषदेत घेण्यात आलाय.
Published on

लग्नकार्यापूर्वी प्री वेडिंग शुटची क्रेझ लोकांमध्ये वाढत चालली आहे. अनेक कपल्स लग्न करण्यापूर्वी प्री वेडिंग शुट हमखास करतात. खास डेस्टिनेशनला जाऊन कपल्स प्री वेडिंग शुट करतात. मात्र, हीच प्री वेडिंग शुट आपल्या संस्कृतीचा भाग नसून, येत्या काळात आगरी समाजाच्या लग्नात कुणीही प्री वेडिंग शुट करू नये अशा प्रकारचा मोठा निर्णय आगरी परिषदेत घेण्यात आलाय.

लग्न कोणत्याही समाजाचे असो, अनेक कपल्स सध्या आवर्जून प्री वेडिंग शुट करतात. विविध डेस्टिनेशन किंवा पर्यटन स्थळाला भेट देत शुट करतात. मात्र, प्री-वेडिंग शूट आपल्या संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे येत्या काळात आगरी समाजाच्या लग्नात कुणीही प्री-वेडिंग करू नये. अशा प्रकारचा मोठा निर्णय आगरी परिषदेत घेण्यात आला आहे. याशिवाय समाजाच्या हिताचे काही महत्त्वाचे ठरावही घेण्यात आले आहे.

Pre wedding Shoot
Shivani Sonar Wedding: प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सोनार अडकणार लग्नबंधनात; कोण आहे तिचा होणारा नवरा?

बदलापुरात तीन दिवसीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आगरी समाज बांधवांची आगरी परिषद घेतली होती. याच परिषदेत घरातल्या लग्नकार्यात प्री वेडिंग शूटिंग करू नये, असा निर्णय घेण्यात आलाय. प्री वेडिंग शूटची प्रथा ही संस्कृतीला मारक आहे. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे यापुढे कुणीही प्री वेडिंग शूट करणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय.

Pre wedding Shoot
Wedding Rituals: मंगळसूत्रामध्ये दोन वाट्या का असतात? जाणून घ्या महत्त्व

अनेक आगरी समाजाच्या लग्नकार्यात मानपान म्हणून साड्या देण्याची पद्धत आहे. हीच प्रथा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नकार्यात अवास्तव खर्च करण्यापेक्षा त्या खर्चाचा उपयोग वधू-वराच्या भविष्यासाठी करावा असाही विचार या परिषदेत मांडण्यात आला. या निर्णयाचे स्वागत आगरी समाजाच्या बांधवांनी स्वागत केले असून, अनेकांनी या निर्णयाचे कौतुक देखील केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com