महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप! ठाकरे गटानंतर आता शरद पवारांनाही धक्का? खासदार NDA च्या संपर्कात

Maharashtra Politics: ठाकरे गटातील संभाव्य फुटीनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदारही एनडीएच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSaam tv
Published On

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले. ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस्च्या (शरदचंद्र पवार) खासदारांमध्येही मोठी अस्वस्थता आणि चलबिचल सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही फुटण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीमधील (MVA) काही महत्त्वाचे खासदार NDA च्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे काही खासदार थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्षांतराचे नवे वारे वाहू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

३ खासदार 'एनडीए'च्या वाटेवर?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेमके किती खासदार एनडीए किंवा सत्ताधारी गटाच्या संपर्कात आहेत, याची कोणतीही अधिकृत आकडेवारी किंवा नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. परंतु, राजकीय गोटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास ३ खासदार या प्रक्रियेत सक्रिय असून ते सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळातील राजकीय घडामोडी पाहता हा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.संपर्कात असलेले हे ३ खासदार कोण आहेत आणि ते कधी जाहीर पाऊल उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
मोठी बातमी: ओमराजे निंबाळकर रात्रीच दिल्लीला रवाना; शिंदे गटात प्रवेश करणार? सस्पेन्स कायम, दिल्लीत हालचालींना वेग

महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र असतानाच, अचानक घडलेल्या या अंतर्गत घडामोडींमुळे विरोधी पक्षांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनंतर आता थेट पवारांच्या निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या खासदारांमध्येही बिघाडी सुरू झाल्याने, महाविकास आघाडीच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आपल्या पक्षातील खासदारांना रोखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून आता अंतर्गत पातळीवर हालचाली आणि मनधरणी सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Sharad Pawar
पुण्यात 'ते' चार्टर विमान उतरलं अन्...; खासदार ओमराजेंच्या 'त्या' गुप्त प्रवासावर ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com