मराठी लोकांना भंगार म्हणणाऱ्या परप्रांतीयाला दाखवली 'औकात', मनसेचा खळ्ळखट्ट्याक! वाद नेमका कशावरून झाला?

MNS Confronts Non-Marathi Family in Nashik: मुंबईनंतर नाशिकमध्येही परप्रांतीय आणि मराठी वाद उफाळून आलाय. गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून परप्रांतीयाने मराठी माणसांना उद्देशून अपशब्द वापरलेत.
Police registering complaints as Marathi and Non-Marathi families clash over minor car accident in Nashik.
Police registering complaints as Marathi and Non-Marathi families clash over minor car accident in Nashik.Saam Tv
Published On

हिंदी भाषा आणि परप्रांतीयांच्या मुद्यावरुन नुकतच मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. मराठीच्या मुद्यावरुन ठाकरे बंधूही एकत्र आलेत. मात्र आता हा वाद मुंबईपर्यंत मर्यादित न राहता नाशिकमध्येही पोचलाय.केवळ गाडीचा धक्का लागला यावरून हा वाद झाला होता. शहरातील जय भवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय महिला रामेश्वरी पंडित गाडी शिकत होती. तिच्या गाडीचा धक्का लासुरे कुटुंबाच्या वाहनाला लागला.

त्यानंतर गाडीच्या नुकसानीच्या खर्चावरुन वाद झाला. तेव्हा मराठी लोगो की औकात क्या? तुम मराठी लोक भंगार हो, अशी मुजोरी पंडीत कुटुंबाने केल्याचा आरोप आहे.

यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी रामेश्वरी पंडित यांचे सासरे वैद्यनाथ पंडित यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी अरेरावीची भाषा वापरल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.या सगळ्या वादानंतर परप्रांतीय कुटुंबीयांनी देखील आपली बाजू मांडली. आम्ही मराठी माणसाला कुठलाही अपशब्द वापरला नाही असा दावा करत नरमाईची भूमिका घेतली

दरम्यान या सगळ्या वादाप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये लासुरे कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. या परप्रांतीय कुटुंबीयांकडून देखील पोलिसांकडे तक्रार करण्यात आलीय. त्यामुळे आता या मराठी विरुद्ध परप्रांतीय वादावर पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर पडदा पडतो की हा वाद अजून वाढतो? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com