Accident News : कोकणात भीषण अपघात, दशावतार नाट्य मंडळाची गाडी काँक्रीट मिक्सरला धडकली अन्...

Accident in Konkan : दशावतार नाट्य मंडळाची गाडी काँक्रीट मिक्सरला धडकली आणि भीषण अपघात झाला आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Accident in Konkan
Accident Newssaam tv
Published On
Summary

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग प्रतिनिधी

माजगाव येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजगाव (Mazgaon ) येथे भीषण अपघात (Accident News ) झाला आहे. कुडाळ (kudal ) येथील सिंधू कला दशावतार नाट्य ( Dashavatar Drama) मंडळाचा टाटा मॅजिक गाडीचा माजगाव येथे भीषण अपघात झाला. रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी समोरून येणाऱ्या काँक्रीट मिक्सरला धडकून पलटी झाली.

माजगाव येथील अपघातात चालक शशिकांत राऊळ आणि संतोष केसरकर हे गंभीर जखमी झाले आहेत. शशिकांत राऊळ ४५ वर्षांचे तर संतोष केसरकर हे ३५ वर्षांचे आहेत. गाडीतील कलाकारही जखमी झाले. गाडीतील कलाकार ओंकार धुरी नेरूर येथे राहणारा, नाणोस येथे राहणारे प्रणित तळकर, मळगाव येथे राहणारे ओम सावंत, वेत्ये येथे राहणारे साई तांबे , ४४ वर्षांचे सुदेश तांबे, कुडाळ येथील गौरव टेंबूलकर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव येथील हे दशावतार मंडळ टाटा मॅजिकने नाटकासाठी जात होते. माजगाव परिसरात भाईसाहेब सावंत समाधी स्थळाजवळ रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी चुकवण्यासाठी चालकाने अचानक वळण घेतले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या काँक्रीट मिक्सरशी जोरदार धडक झाली आणि गाडी पलटी झाली. अपघातानंतर तेथील स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Accident in Konkan
Bigg Boss Marathi 6 : कोणाचं नशीब बदलणार? 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी कोण उचलणार? ग्रँड फिनालेची तारीख अन् वेळ नोट करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com