शाळा ठीक करो अभियानाच्या माध्यमातून अभिजीत दिपकेंनी आता झेडपीच्या शाळांचा चांगलाच पंचनामा सुरू केलाय. हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातून या अभियानाला सुरूवात केल्यानंतर दिपकेंनी आता मराठवाड्यातल्या शाळांची लक्तरं वेशीला टांगली आहेत. दिपकेंनी लातूर जिल्ह्यातल्या शाळांची पाहणी केली. कुठे शाळेला छत नाही तर पिण्यासाठी पाणीच नाही..
कुठे शौचालयाचीही व्यवस्था नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे दिपकेंच्या भीतीनं काही झेडपी शाळांनी तर चक्क खासगी शाळांमधले विद्यार्थी झेडपीच्या शाळेत आणून बसवलं....या विद्यार्थ्यांना विचारल्यानंतर काय झालं ते पाहा...लातूरच्या औसा तालुक्यात उजनी आणि चिंचोली काजळी या शाळेची पाहणी केली. शाळेत अडीच वर्षापासून पिण्यासाठी पाणीच नाही. शौचालयाचीही व्यवस्था नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
सीजेपीकडून सरकारी शाळांचं सोशल ऑडिट सुरु आहे. केंद्रात धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यात शिक्षण मंत्री दादा भुसे CJPच्या निशाण्यावर आलेत. शाळा सुधारता येत नसतील, तर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दीपकेंनी केली आहे.
यापूर्वीच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपरफुटीवरुन शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. दुसरीकडे बोगस शालार्थ आयडी प्रकरणावरुन नागपूर, नाशिक, जळगावमध्ये अटकसत्र सुरु आहे. शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधींची लूट झाली आहे. आता सरकारी शाळांमधील भीषण वास्तव सीजेपीने समोर आणल्याने शिक्षण विभागाचा भ्रष्ट कारभार अधोरेखीत झालाय. त्यामुळे दादा भुसेंच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आक्रमक भूमिका घेणार का याकडे लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.