अभिजीत दिपके यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल; मोठी खळबळ

Abhijit Dipke Booked Along With 5 Others Over Alleged Obstruction: लातूर दौऱ्यात सरकारी शाळांची दुरवस्था, निकृष्ट पोषण आहार आणि शिक्षण विभागाचा कारभार समोर आणणारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह 5 जणांवर औसा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Abhijit Dipke FIR after exposing poor conditions in Latur government schools
Abhijit Dipke FIR after exposing poor conditions in Latur government schoolssaam tv
Published On

संदीप भोसले, साम टीव्ही

लातूर: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशभरात 'स्कूल ठीक करो' अभियान सुरू केले असून ते काल लातूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सरकारी शाळेत जाऊन शाळेची दुरवस्था दाखवली. काही शाळांमध्ये पटसंख्या कमी असल्याने इतर शाळेचे विद्यार्थी आणून बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. शाळेत निकृष्ट अन्न हे विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचे ही समोर आले. यावरून अभिजीत दिपके यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Abhijit Dipke FIR after exposing poor conditions in Latur government schools
जिल्हा परिषद शाळेत बसवले ऊर्दू शाळेचे विद्यार्थी; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यात शिक्षण विभागातील मोठा 'झोल' उघड

दरम्यान शाळेची पाहणी करण्यासाठी कुठलीही परवानगी न घेता आणि औसा येथील शिक्षकांना धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केला यामुळे अभिजीत दिपके यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शाळेचे खरे वास्तव्य समोर आणणे हा जर गुन्हा असेल तर असे अनेक गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया CJP चे कार्यकर्ते अजिंक्य शिंदे यांनी सांगितले.

Abhijit Dipke FIR after exposing poor conditions in Latur government schools
Exclusive: गांधी- नेहरू, आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

दरम्यान अभिजीत दिपके यांनी केलेल्या दौऱ्यामध्ये अनेक शाळांचे भीषण वास्तव समोर आणल्याने शिक्षणविभागाचा मोठा भोंगळ कारभार समोर आला. मध्यान्हमध्ये विद्यार्थ्यांना जो पोषण आहार दिला जातो त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जा असल्याचे आढळून आले. तसेच किचनमध्ये देखील अस्वच्छता दिसून आली. तसेच आंबेगावच्या एका शिक्षिकेने देखील एक व्हिडिओ बनवत शाळेत विद्यार्थ्यांचे काय हाल सुरू आहे हे दाखवले. मात्र प्रशासनाकडून त्यांनाच बडतर्फ करण्यात आले. माध्यमांनी हा विषय लावून धरला आणि त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली. अशातच आता अभिजीत दिपके यांच्यावर ही आता गुन्हा दाखल करण्यात आला असून दिपके यावर काय प्रतिक्रिया देता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com