उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. परिस्थिती अशी आहे की, कधीही भडका उडू शकतो. सध्या देशाचे नेतृत्व करणारे कसे तयार झाले, हे आपण जवळून पाहिले आहे. त्यामुळे शिवसैनिक म्हणून आताच्या परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे प्रभावित झालेल्या दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा सुरळीतपणे आणि विनाविलंब उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
योजनेतील कामातून दोन रस्ते कमी झाले तरी चालतील मात्र शाळांच्या बाबतीत दुर्लक्ष होता कामा नये असे वक्तव्य रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी केल आहे. चला शाळेला जाऊया या अभियानांतर्गत आज रायगड मध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळांची पाहणी केली यावेळी अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात भरत गोगावले यांनी उपस्थित मंत्री महोदयांसमोर उद्गार काढलेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज होतेय..
श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलची सांगता सभा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होत आहे.
या सभेला युवा नेते जय पवार यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
त्याचवेळी जय पवार यांनी खुर्चीचा आग्रह टाळून कार्यकर्त्यांसमवेत उभं राहून विविध पदाधिकाऱ्यांची भाषणं ऐकली.
दिल्लीत CJP चे आंदोलन, राहुल गांधी चेन्नईला जाणार
राहुल गांधी यांचा उद्या चेन्नईत छात्रो की गुंज कार्यक्रम
सायंकाळी 5 वाजता चेन्नईत होणार कार्यक्रम
कोटा, प्रयागराज, डेहराडून, पुणे आणि इंदुरनंतर चेन्नईत कार्यक्रम
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच रंगू लागली आहे.
अनेक जण माझं बोट धरून गोकुळमध्ये आले, आता तेच महायुती-महायुती करत आहेत, असा टोला सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता कालच्या पत्रकार परिषदेमध्ये लगावला.
त्याला मुश्रीफ यांनीही आपल्या खास शैलीत आज प्रत्युत्तर दिलंय. “माझा हात काय इतका बारका हाय व्हय रं?” असा सवाल करत मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना प्रतिटोला लगावला.
करमाळा तालुक्यातील करंजे गावातील शेतकरी संतोष गावंडे यांनी आत्महत्या केली
सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती
याबाबत करमाळा पोलिस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली
याबाबतचा अधिक तपास करमाळा पोलिस करत आहेत
बारामती -
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक
सांगता सभेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार यांचे आगमन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला झाली सुरुवात
दिल्लीतील जंतरमंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात
९ फूट उंचीचे बॅरिकेट्स जंतर-मंतर वरती लावण्यात आले आहेत
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
मात्र त्याआधी राष्ट्रपती भवन बाहेर कर्तव्य पथ येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला
दिल्लीतील आंदोलनाला जाऊ नये म्हणून मुंबईतील कार्यकर्त्यांना नोटीस
दिल्लीतील आंदोलनाला परवानगी नसल्यानं आंदोलनाला जाऊ नये असं पोलिसांचे आवाहन
महाराष्ट्र : प्रतिबंधित, भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात धडक मोहीम राबवली आहे. नाशिकमध्ये विमल पान मसाला आणि व्ही-वन तंबाखूच्या वाहतुकीवर कारवाई करत ६९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्यभरात सुपारी, दूध, पनीर, फरसाण, भगर आणि सोयाबीन तेलाच्या साठ्यांवरही कारवाई करण्यात आली. मुंबईतील अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० हॉटेल व अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. विविध प्रकरणांत एफआयआर दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.
कल्याण : क्रिकेटचा सामना खेळल्यानंतर पोहण्यासाठी गेलेल्या कल्याणच्या दोन अल्पवयीन क्रिकेटपटूंचा रत्नागिरीत डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. सौरभ आणि शुभम रमेश यादव अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघेही अवघ्या १६ वर्षांचे होते. या घटनेमुळे कल्याण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी होत आहे.
सोलापूर : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे शेतीपिकांची पाहणी केली. यावेळी सोयाबीन आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, भूजल पातळी आणि पेरणीनंतर झालेल्या पावसाबाबत पथकाने माहिती घेतली. चारा डेपो की चारा छावण्या सुरू कराव्यात, याबाबतही विचारणा करण्यात आली. गावकऱ्यांनी टँकर सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.
डोंबिवली : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत ड्रग्ज विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दत्तनगर परिसरात ड्रग्ज विक्रीचा सुळसुळाट असल्याचा आरोप एका हतबल वडिलांनी केला आहे. आपल्या दोन मुलांना व्यसनाधीनतेने ग्रासल्याने चिंतेत असलेल्या या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. परिसरातील ड्रग्ज विक्रीवर कारवाई करण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाण्यात मोर्चा
जितेंद्र आव्हाड मोर्चात सहभागी
वोट चोर गद्दी छोडच्या घोषणा
राजीनामी घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींनाचा
न्यायालयीन चौकशीसाठी आम्ही तयार
पेपर फुटला तेव्हा विद्यमान अध्यक्ष नव्हतेच
वर्धा : धाम मध्यम प्रकल्पात सध्या ७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाण्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातील १० टक्के बफर स्टॉक पुढील वर्षासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. उर्वरित पाण्याचे नियोजन पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर आणि सिंचन या क्रमाने केले जाणार आहे. ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंतचे नियोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने आणि जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याण : कल्याण न्यायालयाच्या नव्या इमारतीतील लिफ्ट बंद पडल्याने दोन वरिष्ठ वकील सुमारे तासभर आत अडकून पडले. आपत्कालीन हेल्पलाईनवर वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही वकिलांची सुटका केली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात वकिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) दुर्लक्षावर प्रश्न उपस्थित करत वकिलांनी पॉवर बॅकअप आणि अखंडित वीजपुरवठ्याबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी केली आहे.
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी बुरलेवाडी येथील खरीप हंगामातील बाजरीचे पीक जळून खाक झाले असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी बाजरीची कणसे वाळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. उद्या केंद्रीय पथक दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार असून, त्यापूर्वी आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सांगोला दौऱ्यावर येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत.
- सरकारने नवी दिल्ली आणि निजामुद्दीनहून येणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवण्याच्या आपल्या निर्णयात सुधारणा करावी.
- ५७ मेट्रो स्थानके बंद करण्याचा निर्णय नागरिकांसाठी एक समस्या आहे, त्यामुळे याचा विचार करा.
- मेट्रो आणि रेल्वे सेवा पूर्णपणे थांबवणे योग्य ठरणार नाही.
- काळजीपूर्वक विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
उद्योगांना दिल्या जाणाऱ्या पर्यावरणविषयक संमतीच्या (कन्सेंट) प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे दाखवणारे कथित व्हिडिओ समोर आले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पुण्यातील सहा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब म. कुकडे यांच्यापासून क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत एकाच वेळी कारवाई झाली आहे. त्यामुळे ही कारवाई लक्षवेधी ठरली आहे.
भाजपकडून कौस्तुभ गावडे तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर तर अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्यात तिहेरी लढत
पुणे पदवीधर मतदारसंघात जाधव विरुद्ध जाधव असा सामना
पदवीधर मतदारसंघात महा विकास आघाडीकडून हर्षदा जाधव देशमुख विरुद्ध भाजपच्या डॉ स्मिता जाधव असा सामना
सचिन सानप उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत
पुणे शिक्षक मतदार संघाकडून डॉक्टर प्राध्यापक सचिन सानप निवडणूक लढवणार
पुणे शिक्षक मतदार संघाकडून आता कौस्तुभ तावडे यांच्यासह सचिन सानप आणि जयंत आसगावकर यांच्यात तिहेरी लढत
नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन येथे जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द…
CJP ने उद्या 10 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वे रद्द केल्याची माहिती आहे
मुंबई वरून निघणारी राजधानी एक्सप्रेस २२२२१ ही छत्रपती शिवाजी महारज टर्मिनस येथून निघणारी रद्द करण्यात आली आहे…
दिल्लीच्या जंतर-मंतरवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. याठिकाणी कलम 163 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आलीय. या संदर्भात जंतर-मंतरच्या बॅरिकेड्सवर बोर्ड लावण्यात आलाय. आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२६- २७ करिता द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, नारळ, संत्रा, अंजीर, आंबा व डाळिंब या पिकांसाठी सहभागी होण्यासाठी https://www.pmfby.gov.in या राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते आणि दिव्यांग क्रांती प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेपुढे सुरू केलेल्या आंदोलनाला भेट दिली. दिव्यांग निधीचा खर्च न केल्याबद्दल दिव्यांगांनी त्यांना तक्रारी केल्या. यानंतर बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांसोबत महानगरपालिकेत बैठक घेत विषय समजून घेतला. गेली सलग चार वर्षे दिव्यांग निधी खर्चच झाला नसल्याची गंभीर बाब लक्षात येताच बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला. आयुक्त यासाठी जबाबदार असून, हा निधी खर्च न झाल्यास आयुक्तांचा हनुमान करू आणि शहरभरातून मिरवणूक काढू, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला.
केंद्राचे तीन सदस्य असलेले पदक बीड जिल्ह्यातील दुष्काळ पाहण्यासाठी दाखल झाले असून गेवराई शहर जवळ जातेगाव फाटा परिसरात कपाशी पिकाची पाहणी केली.. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला.. गतवर्षी कोणते पीक घेतले होते त्यातून किती उत्पन्न मिळाले होते यावर्षी काय परिस्थिती आहे तसेच गाव परिसरातील विहिरींना पाणी आहे का याबाबतची माहिती पथकाने शेतकऱ्यांकडून घेतली.. यावेळी शेतकऱ्यांनी माहिती सांगत दुष्काळाची भीषणता पथकासमोर मांडली.. . या पथकात कृषी व शेतकरी कल्याण विभागाच े संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल, महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाच े सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांविरोधात पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर तीव्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आयोजकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी बेकायदेशीरपणे जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठीच पंचनामे करण्याची प्रक्रिया ही तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आकडेवारी आल्यानंतर मदतीचा निर्णय घेता येईल. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील बुरले वाडी आणि राजापूर येथील बाजरी मका येथील पिके पावसा अभावी जळाली आहेत. त्याची पाहणी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी पावसा अभावी पिके हातून गेल्याचं कृषी मंत्र्यांना सांगितले.
पदवीधर निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी अखेर शमली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याविरोधात भाजपचे माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी 'मैत्रीपूर्ण लढत' म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर देशमुखांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे महायुतीतील मतविभाजनाचा धोका टळला आहे.
भिवंडीत गुलाबजामुनच्या ट्रेमध्ये चक्क जिवंत उंदीर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गैबी नगर परिसरातील हरीश गुलाबजामुन स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गुलाबजामुनच्या ट्रेमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने संबंधित दुकानाची पाहणी करून दुकानदाराला ‘स्टॉप टू बिझनेस’ची नोटीस बजावली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रमण सेनाड यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या रमण सेनाड यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी रमण सेनाड यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे. त्यामुळे सेनाड उमेदवारी अर्ज मागे घेणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.
मंगेश चिवटे यांना माघार घेण्याचे एकनाथ शिंदे यांच्या आदेश
मंगेश चिवटे यांनी महायुतीत बंडखोरी करत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता
कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामावर यंदा अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. एल निनोचा प्रभाव मे महिन्यापर्यंत जाणवण्याची शक्यता आणि पावसाने दिलेली ओढ यामुळे आंबा हंगामाच्या सुरुवातीलाच बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याच्या झाडांवर मोहर येण्याऐवजी नवीन पालवी फुटत असल्याचे चित्र दिसत असल्याने यंदाचा हंगाम लांबण्याची भीती आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
रस्ते धुण्याच्या ८.२५ कोटींच्या प्रस्तावाला सर्वपक्षीयांचा विरोध
मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू असताना रस्ते धुण्यासाठी ८.२५ कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता
धूळ आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सात परिमंडळांत १५० दिवस टँकरने रस्ते धुण्याचे नियोजन होतं
मात्र अर्ध्या महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असताना पाण्याच्या वापरावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरलं
दिल्लीतील जंतर-मंतर येथे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. यासंदर्भात जंतर-मंतरच्या बॅरिकेड्सवर सूचनाफलक लावण्यात आले आहेत. परिसरात दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली, तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टाने आज एका सुनावणी दरम्यान तोंडी सांगितले.
ॲाक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेना चिन्ह आणि पक्ष प्रकरण संपणार
निवडणूक आयोगाची बाजू पुढील आठवड्यात मांडली जाईल
आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचे रिजॅाईंडर तिसऱ्या आठवड्यात होईल.
आज सुप्रीम कोर्टात पश्चिम बंगाल एसआयआर ची सुनावणी त्वरीत घ्यावी अशी विनंती वकीलांतर्फं करण्यात आली. त्या वेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले की ३० ॲाक्टोबर पर्यंत शिवसेनेची सुनावणी संपवायची आहे. त्यानंतर बंगाल एसआयआर प्रकरण घेतले जाईल.
महाराष्ट्र सदनात विजय वडेट्टीवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट झाली. यावेळी विजय वडेट्टीवार, अतुल लोंढे आणि संध्या सव्वालाखे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये यावं, अशी मिश्किल टिप्पणी करण्यात आली. त्यानंतर अतुल लोंढे यांनी विखे पाटील यांचा हात हातात घेत विजय वडेट्टीवार यांना उद्देशून, “वापसीचा रस्ता खोल रहे हो क्या?” असा सवाल केला. अतुल लोंढे यांच्या या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील हसून तेथून निघून गेले. महाराष्ट्र सदनातील या भेटीची आणि त्यावेळी झालेल्या मिश्किल संवादाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
गाझीपूर, चिल्ला, टिकरी, सिंघू, गुरुग्राम, कापसेहरा, लोनी आणि बदरपूर या बॉर्डरवर विशेष खबरदारी बाळगली जाणार
दिल्ली पोलिसांनी विविध राज्यांच्या पोलीस दलांशी समन्वय साधून एक रणनीती आखली
जालना जिल्ह्यातील किनगाववाडी शिवारात पाण्याअभावी मोसंबीच्या बागा वाळल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. खायला दाणे नाहीत, जनावरांना पाणी नाही आणि हाताला कामही नाही, अशा व्यथा महिला शेतकऱ्यांनी मांडल्या. शेतीतून उत्पन्न मिळत नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणेही कठीण झाले असून पुण्यात शिकणाऱ्या मुलांना घरी बोलावण्याची वेळ आली आहे. केंद्रीय पथकाने वाळलेल्या मोसंबी बागांची पाहणी केली असून, आता तरी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, पाणीपुरवठ्यासाठी टँकर बनवण्याच्या कामाला वेल्डिंग दुकानांमध्ये वेग आला आहे. काही दुकानांमध्ये दररोज चार ते पाच टँकर तयार केले जात असून दुष्काळामुळे टँकरची मागणी वाढत आहे.
जालना जिल्ह्यातील नानेगाव आणि किनगाववाडी शिवारात केंद्रीय पथकाने पाहणी केली. यावेळी सोयाबीन, कपाशी आणि फळबागांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या. केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीच्या परिस्थितीची माहिती घेतली.
पूनम इस्टेट क्लस्टर-१मध्ये नवरात्रोत्सवानिमित्त गरबा, दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या परवानगीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोसायटीतील सुमारे १२० कुटुंबांनी ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नाहरकत दाखल्याची मागणी केली होती. मात्र, २८ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत कार्यक्रमांना परवानगी नाकारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी काही रहिवाशांनी उपनिबंधकांच्या निर्देशांचे पालन होत नसल्याचा आरोप करत कार्यक्रमांवरील अडथळे दूर करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्लीत INDIA आघाडीचे १० सदस्यीय शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या शिष्टमंडळात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश असू शकतो. दरम्यान, विरोधी पक्षांचे खासदार आज निषेध मोर्चाही काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राष्ट्रपती भवनाकडून भेटीसाठी वेळ निश्चित झाली आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
कॉक्रॉच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. १० ऑक्टोबरच्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हजारो तरुणांना ताब्यात घेतल्याचा दावा त्यांनी केला. “मोदीजी, ही दडपशाही यशस्वी होणार नाही, तरुण आता घाबरत नाहीत,” असे दीपके यांनी म्हटले. तसेच, उद्या दिल्लीत पोहोचून कोणत्याही परिस्थितीत जंतरमंतरच्या दिशेने मोर्चा काढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील किनगाव वाडी येथे केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक दाखल झाले आहे. पथकाकडून मोसंबी फळबागांसह इतर पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. दुष्काळामुळे शेतीपिकांवर झालेल्या परिणामांचा आढावा पथकाकडून घेतला जात आहे. या पाहणीनंतर केंद्र सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या जातात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नंदुरबार शहरातील घरकुल परिसरात दिवसाढवळ्या तरस मुक्तपणे फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरवस्तीत तरस फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मानवी वस्तीत वन्यप्राण्याचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या तरसाला तातडीने पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडावे, अशी मागणी नागरिकांकडून वनविभागाकडे करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची 3 पथके राज्याच्या दौऱ्यावर आली आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये पथके प्रत्यक्ष पाहणी करून पीक नुकसानीचा आढावा घेणार आहेत. पाहणीनंतर ही पथके केंद्र सरकारला अहवाल सादर करतील. या अहवालाच्या आधारे दुष्काळग्रस्तांना एनडीआरएफअंतर्गत मदत देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
बीड जिल्ह्यात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचे ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, सात लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या माहितीनुसार, पंचनाम्याचा अंतिम अहवाल उद्या शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीण प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात
पेटा संस्थेने सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका
माधुरी हत्तीण पुन्हा वनतारामधे किंवा कर्नाटकच्या जंगलात पाठवा अशी केली मागणी
पुण्यातील एम पी एस सी करणाऱ्या आंदोलनातील तीन जणांनी उपोषण सोडलं विद्यार्थ्यांचे आंदोलन मात्र सुरू
पुण्यातील एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा दहावा दिवस
काँग्रेस ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी रणनीती आखताना पाहायला मिळत असताना पुढील काही दिवस हे आंदोलन सुरु ठेवण्यासाठीची तयारी
राहुल गांधी यांचा ममता बॅनर्जी,तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची सूत्रांची माहिती
जळगावच्या निंभोरा पोलिसांनी अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा व पानमसाला वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे.
बऱ्हाणपूर फाट्याजवळ कारवाई करत सुमारे ४ लाख ५० हजार ४४० रुपयांचा गुटखा-पानमसाला जप्त करण्यात आला.
CJP आंदोलनाच्या आधीच पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केलं डिटेन
१० ऑक्टोबरला CJP कडून जंतर मंतरवर दिली आहे आंदोलनाची हाक
CJP चे राजस्थानमधील पदाधिकारी संजू शर्मा यांना रिंगस पोलिसांनी केलं डिटेन
हसतखेळत शाळेत सोडले, काही तासांत मृत्यूची बातमी
सन्मित्र सैनिक स्कूलमधील १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
सायबर फसवणुकीत गोठवलेली बँक खाती एसओपीनुसार सुरू करण्याबाबत हायकोर्टाचे निर्देश
खातेदारांच्या तक्रारींवर कालबद्ध कार्यवाही करण्याचे बँकांना आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा विविध याचिकांवर एकत्रित निकाल दिलाय..
राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचे खासदार राष्ट्रपतींना भेटणार
सकाळी १० वाजता इंडिया आघाडीचे खासदार घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी करणार मागणी
बालाघाटच्या खासदाराच्या गाडीनं भंडाऱ्यात दोघांना चिरडलं
दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी
तुमसर - रामटेक मार्गावरील उसर्रा इथं घडली घटना
बईच्या महत्त्वाचा पूर्वद्रुतगती मार्गावर मुंबईकडे येणाऱ्या दिशेला मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावर मुलुंड जवळ छेडा नगर ते आनंद नगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे मुलुंड पुलाजवळ बॉटल नेक तयार झाला आहे.
याचा फटका मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीला बसला असून ठाण्याकडून मुंबईत येणाऱ्या मार्गावर टोल नाक्याच्या मागे पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे भीषण अपघात
भरधाव डंपरची तीन दुचाकींना मागून जोरदार धडक
अपघातात चौघांचा मृत्यू
एका महिलेसह दोन पुरुषांचा मृत्यू; चार जण गंभीर जखमी
तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात
घाटशिळ पार्किंग परीसरात वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात
१२ ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त गावांत चारा पोहोचवा
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना
उदगीर तालुक्यात बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी
पंढरीचा विठुराया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावला !
विठ्ठल मंदिर समितीची मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोंटीची मदत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.