

पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतानाच, आता अकोला पोलीस दलाने देखील इंधन बचतीसाठी अभिनव उपक्रम राबवला. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होतंये. अकोलेकरांना ऑनलाईन भेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यामुळे इंधन बचत आणि वेळेची बचत या उपक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून अकोला पोलीस दलात "SP- ई-संवाद" ऑनलाईन मीटिंग'हा अभिनव उपक्रम हाती घेतलाय. नेमकं कसा आहेये "SP- ई-संवाद" ऑनलाईन उपक्रम पाहुयात.
रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यात पुल कोसळल्याची घटना घडली आहे. सुधागड तालुक्यातील अमनोली गावाजवळ हा पुल असून पुल तुटल्याने जांभूळपाडा पासून आमणोली, दहिगाव, कोलतरे आणि आदिवासी वाड्यांकडे जाणारा हा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. हा पुल जुना असून या पुलावरून हायवा डंपरची अवजड वाहतूक सुरू असताना पुल तुटण्याची दुर्घटना घडली. यावेळी हायवा डंपर खाली कोसळला, सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. पावसाळा तोंडावर असताना पुल तुटल्याने ग्रामस्थां समोर रहदारीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अवजड वाहतुकी विरोधात ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
आनंद परांजपे यांचा थोड्याच वेळात होतोय शिवसेनेत पक्षप्रवेश
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
14 वर्षानंतर आनंद परांजपे यांची घरवापसी
सोलापूर -
अक्कलकोट येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमाला जाताना शिवसेना भाजप खासदार आमदार याचं मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना डिझेल आणि पेट्रोल यांची बचत करण्याचा केला होता आव्हान..
शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, भाजपा आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल यांचा एकाच गाडीतून प्रवास
सोलापूर ते अक्कलकोट तीस किलोमीटरचा प्रवास एकाच गाडीतून प्रवास करत दिला सकारात्मक संदेश
सोलापूर -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा मागितली स्वामी चरणी
श्री स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा करण्यात आला सन्मान
तदनंतर नितीन गडकरी यांनी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ ट्रस्ट येथे दिली भेट
यावेळेस मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अन्नक्षेत्र येथील स्वामींचे पूजन करण्यात आले
यानंतर अनुछत्र मंडळाचे नूतन अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या हस्ते नितीन गडकरी यांचा सन्मान करण्यात आला..
छत्रपती संभाजी महाराजांची जयंती महाडमध्ये साजरी
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांची 369 वी जयंती महाडमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने महाड शहरात शिवप्रेमींनी चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन केले होते.
सोलापूर -
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनकडे केंद्रीय रास्ते मंत्री नितीन गडकरी यांचे दुर्लक्ष
- अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
- आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यात फक्त 3 चा गाड्या असणार असं केल होत जाहीर
- मात्र अंमलबजावणीत दिसून आली विसंगती
पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत...
सुनेत्रा पवार प्रतिभा पाटिल, चंद्रकांत पाटिल , माधुरी मिसाळ, मुरलीधर मोहोळ, शरद पवार यांच्यासह सर्वांच्या ताफ्यातील वाहने निम्म्याने केली कमी
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर हिंगोलीत राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते आज हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चार्जिंग स्कूटर वरून पोहोचल्याच पाहायला मिळालं मात्र हिंगोलीत पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाने हेल्मेट सक्ती केली असताना खासदार महोदय मात्र विना हेल्मेट सुसाट धावल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात केवळ रूपाली चाकणकर यांच्यावर कारवाईचा दिखावा करून सरकार मूळ विषयाला बगल देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वर्षभर सोने खरेदी करू नका इंधन कमी वापरा या पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर परळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आज अनोख आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातात आपट्याच्या फांद्या घेत केंद्र सरकार आणि पंतप्रधान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली
भिवंडी महानगरपालिकेच्या पाच प्रभाग समिती त्यांच्या सभापती पदाच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये भाजपा व काँग्रेस यांची प्रत्येकी दोन सभापती विजयी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) गटाला एक सभापती पद मिळवता आले आहे. गुरुवारी पालिका मुख्यालय सभागृहात पिठासन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या अध्यासी अध्यक्षते खाली पार पडलेल्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करतानाच प्रभाग समिती क्रमांक एक प्रभाग समिती क्रमांक दोन व प्रभाग समिती क्रमांक चार या ठिकाणी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. तर प्रभाग समिती क्रमांक तीन येथे दोन तर प्रभाग समिती क्रमांक पाच येथे तीन उमेदवारी अर्ज दाखल होते अर्ज माघारी घेण्याच्या पंधरा मिनिटांच्या वेळेमध्ये प्रभाग समिती क्रमांक तीन मधून शिवसेनेचे संजय भोईर यांनी माघार घेतली त्यामुळे या प्रभागातून भाजपाच्या रंजिता मोहन कोंडा बिनविरोध विजय झाल्या.तर प्रभाग क्रमांक पाच येतील दोन उमेदवाराने अर्ज माघार घेतल्यानंतर भाजपाचे एडवोकेट वैभव एकनाथ बिनविरोध विजय झाले आहेत.
प्रभाग समिती क्रमांक १ - हसनने फारूखी - राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.)
प्रभाग समिती क्रमांक २ - तबसुम झाकीर बेग - काँग्रेस
प्रभाग समिती क्रमांक ३ - रंजीता मोहन कोंडा - भाजपा
प्रभाग समिती क्रमांक ४ - समिना मोह.इमरान अन्सारी - काँग्रेस
प्रभाग समिती क्रमांक ५ - अँड.वैभव एकनाथ भोईर - भाजपा
धुळ्यातील देवपूर भागात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या एका भोंदू बाबाचा तृतीयपंथी समाज आणि भगत-डांखे मंडळींकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे, महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी जोगी यांच्या नेतृत्वात प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे
ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशन च्या हद्दीत नव्याने तयार करण्यात इमारतीसाठी पाणी साठून ठेवण्यासाठी बनवलेल्या खड्डा मध्ये पडून एका दोन वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. न्यूमन असे बालकाचे नाव आहे. एस के कंपाऊंड या ठिकाणी सदर चा प्रकार घडला. आहे. प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत.
ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, सातत्य दाखवावे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाची सर्वत्र चर्चा होत आहे.
मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली
निवडणुकीपर्यंत का थांबले
एक दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही
छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव केंद्र सरकारच्या महापुरुषांच्या यादीत नसल्याचा खळबळ जनक आरोप इतिहास संशोधक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी केला आहे. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव महापुरुषांच्या यादीत घेतलं मात्र केंद्र सरकारच्या महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच नाव नाही ,ही अत्यंत लांचनास्पद बाब आहे.केंद्र सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचे नाव महापुरुषांच्या यादीत घ्याव अन्यथा साहित्यिक दिल्लीत येऊन आंदोलन करतील असा इशाराही गोरे यांनी दिला आहे.छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे डॉ.शरद गोरे यांनी मराठीमध्ये अनुवादित केला आहे.धाराशिव मध्ये आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यानंतर गोरे यांनी हा इशारा दिला आहे.
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मैलाचा दगड ठरणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-१ च्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गिकेचे काम वेगाने सुरु आहे.
या ५.४६ किमी लांबीच्या संपूर्ण भुयारी मार्गिकेसाठी आवश्यक असलेल्या पहिल्या 'टीबीएम टनेल सेगमेंटच्या कास्टिंग कामाचे उद्घाटन झाले.
- नाशिकच्या उच्चभ्रू कॅनडा कॉर्नर परिसरात एका अलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये शुभमचे आहे कार्यालय
- SR Education Consultancy नावाने डॉक्टर शुभम खैरनारचे आहे कार्यालय
- शुभमच्या कार्यालयाच्या महाराष्ट्रासह ईतर राज्यातही शाखा असल्याची माहिती
- शुभमच्या या कार्यालयात नक्की काय कारभार चालायचा ? हा प्रश्न उपस्थित
बीड शहरातीन पंढरी नगरी एका 6 वर्षीय वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.
कुत्र्याने हल्ला केला त्यावेळी शेजारच्या एका व्यक्तीने त्यांना हुसकून लावल्यामुळे चिमुकल्याचा जीव वाचला.
अक्षरश: मोकाट कुत्र्याची टोळी लहान चिमुकल्याला ओढून घेऊन जाताना दिसतंय.
चिमुकल्याला पंधरा ते वीस फूट ओढून नेत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे
पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती येथे महागणपती मंदिरासमोर एसटी बसने गॅस टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे.
भोर महाड मार्गावरील वरंध घाट रस्त्यावर वारवंड गावच्या हद्दीत कार रस्त्याच्या कडेच्या चारीत जाऊन पलटी होऊन अपघात झाल्याची घटना
सुदैवाने अपघातात कुठलेही जीवितहानी नाही
वारवंड येथील एका तीव्र वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती
कार महाडवरून भोरच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आपले शासकीय वाहन सोडून ऑफिस ते घर असा सायकल ने प्रवास सुरु केला इंधन वाचविण्यासाठी ऑफिस ते घर हा 1 किमी रोज सायकल ने ते ऑफिस जाणार आहेत असं संकल्प त्यानी केला यातून इंधन बचत ते प्रदूषण कमी होणार या राष्ट्रीय कार्यात हातभार लावला आहे
नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर NTA ने नीट परीक्षा अखेर रद्द केली. नीट परीक्षा रद्द केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. नांदेड मध्ये देखील NSUI या संघटनेने NTA आणि केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी NSUI या संघटनेने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोलचा वापर जपून करा, सोन्याची खरेदी करु नका असं आवाहन केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष चांगलाच आक्रमक झालाय. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी बैलगाडीमधून प्रवास करत नगरपालिका गाठलं आणि नगराध्यक्षांना निवेदन दिलं. मोदींनी केलेल्या आव्हानाला अनुसरून बदलापुरातील सर्व लोकप्रतिनिधींनी तसच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैलगाडी किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. दरम्यान सुरुवातीला नगरपालिका कार्यालयात बैलगाडी आणण्यास पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केल्यामुळे पालिका अधिकारी आणि देशमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाली. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने दौंड तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आखाती युद्धाचा परिणाम अजूनही भारतावर आणि महाराष्ट्र राज्यावर झालेला दिसून येत आहे. अशाच प्रकारे नवी मुंबई शहरातील खारघर सेक्टर 12 मधील एचपी पेट्रोल पंप चार दिवसापासून बंद आहे त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालकांची फजिती आणि त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कारण चार दिवसापासून खारघर मध्ये पेट्रोल मिळत नसल्यामुळे त्यामुळे प्रवाशांना परत वाहन घेऊन बाहेर पडावा लागत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत बारामती मधील राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबाराचा आयोजन करण्यात आले आहे..
जनता दरबाराला बारामती तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी लावलीय...
सकाळी 11.00 ते 3.00 वाजेपर्यंत हा जनता दरबार असणार आहे
वाशिम शहरातील अत्यंत गजबजलेला आणि मुख्य परिसर असलेल्या पाटणी चौकातील दूध डेअरीत रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांने दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केलीये.
चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. एक दिवसांपूर्वी याच पाटणी चौकात सायंकाळच्या सुमारास भर गर्दीतून चैन स्नेचींगची घटना ताजी असताना मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात भीतीच् वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विशेष सन्मान करून जेजुरी मध्ये स्वागत
गडकरी यांचे जेजुरीमध्ये विशेष पगडी घालत केले स्वागत
जेजुरीच्या मानाची पगडी घालत नागरिकांनी केलं स्वागत
पालखी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आज नितीन गडकरी पुण्यात
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीच्या प्रसिद्ध श्री बिरोबा देवस्थानाच्या विकासाठी 150 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये आराखड्यास मंजूरी देण्यात आली
संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा
झाडे उन्मळून पडली
दोघांचा मृत्यू, तर जनावरे दगावली
रुपाली चाकणकर ईडी ऑफिसमध्ये दाखल
भोंदू अशोक खरात प्रकरणात होणार चौकशी
नीट पेपर फुटी प्रकरणातील पुण्यातून ताब्यात घेतलेल्या महिलेची धक्कादायक माहिती समोर
नीट परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान मनीषा वाघमारे यांच्याकडे तब्बल 21 वेगवेगळ्या बँक खात्यांतून लाखो रुपये जमा, तपासातून माहिती समोर
ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्यासंबंधित व्यवहारांसाठी आगाऊ म्हणून घेण्यात आल्याचा संशय
या 21 खात्यांचा मालक कोण आहे आणि हा पैसा नेमका कोठून आला, याचा तपास सीबीआय करत आहे
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला..
यावेळी द्राक्ष बागेच्या शेड वरील पत्रे आणि आणि घरावरील पत्रे अनेकांचे उडून गेले त्यामुळे नुकसान झाले.
तर खलाटी येथे आनंदा बिरु शेजुळ यांच्या घराचे पत्रे उडुन गेले. आणि त्याच दरम्यान घराची भिंत पडून अवघ्या 8 महिन्याच्या लहान मुलगा श्रीवर्धन शेजूळ हा मयत झाला आहे.
शेवटच्या टप्प्यात हापूस आंब्याची आवक वाढल्यामुळे आंब्याचे दर गडगडले आहेत.
सावंतवाडी बाजारपेठेमध्ये हापूस आंब्याचे दर तब्बल 120 रुपये डझन एवढ्या कमी दराने खाली आले आहेत.
200 ते 250 रुपये डझन असणारा हापूस आंबा आज सावंतवाडी बाजारपेठेत सकाळीच 120 रुपये डझनाने विक्री केला जात होता. आंब्याचे दर गडगडले
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील शिवाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करून या बाईक रॅलीस सुरुवात झाली. या रॅली मध्ये शक्तिपीठ बाधित मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड, वाळवा गावातील बाधित शेतकऱ्यानी सहभाग घेतला होता. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या स्मृतिभूमीस अभिवादन करून ही बाईक रॅली इस्लामपूर कडे रवाना झाली आहे.
Pune शहरातील सुखसागरनगर भागात काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास एका जुन्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
या आगीत गोदामातील सामानाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2026 27 या वर्षाच्या 1हजार 472 कोटी रुपयांचा आराखड्यांचे नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार असून आमदार खासदारांच्या लोकप्रतिनिधींच्या सूचनाही विचारात घेतल्या जाण्याची शक्यता
अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा परिसरात गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भोंदूबाबाने महिलेसह तिच्या कुटुंबाची 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षासह एकूण 9 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला नगर विकास विभागाने स्थगिती दिली होती. आता भाजपच्या तक्रारीवरून याप्रकरणी 60 दिवसांत अंतिम निकाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरविकास विभागाला दिले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी डिसेंबर 2024 मध्ये अतिक्रमणाला पाठबळ दिल्याप्रकरणी 9 नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. परंतु नगरविकास विभागाने त्या निर्णयाला स्थगिती दिली होती. या प्रकरणाचा अंतिम निकाल नगरविकास विभागाने अद्याप दिलेला नाही.
धनंजय लोखंडेच्या मित्राचा सुद्धा या प्रकरणात सहभाग
ओंकार शिंगोटे असे या तरुणाचे नाव आहे
ओंकार शिंगोटे नावाच्या तरुणाला सी बी आय ने ताब्यात घेतल्याची शक्यता
ओंकार शिंगोटे हा जुन्नर येथील आयुर्वेदिक डॉक्टर असल्याची माहिती
लोखंडे आणि शिंगोटे हे मित्र असून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळून देण्याचे काम करत असे
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम कुठं होणार? याबाबत बराच गोंधळ उडल्यानंतर अखेर आळंदी देवस्थानने परंपरेनुसार भवानी पेठेतचं होणार आहे. आज देवस्थानने पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आणि पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करुन, परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं असून तशी प्रक्रिया ही सुरु झालीये, असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे.
कोकणातील मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच दक्षिणेकडील वाऱ्याने मच्छीमारांच्या अडचणीत भर टाकली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे समुद्रात जाणे धोकादायक बनले असून अनेक बोटी किनाऱ्यावरच थांबल्या आहेत. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असलेल्या मच्छीमारांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वीची शेवटची कमाईही हुकल्याने मच्छीमार बांधव चिंतेत सापडले आहेत. आता शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी कोकण किनारपट्टीवरून जोर धरू लागली आहे.
लग्नाचा मुहूर्त म्हटल की, फुलांचा सुगंध आणि सजावट आलीच; मात्र लग्नसराईच्या धामधुमीत फुलांच्या दरांनी उसळी घेतली आहे. कडक उन्हाळ्यामुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला तर दुसरीकडे मागणी वाढल्याने बाजारपेठेत फुलांचे दर चांगलेच वाढले आहेत. सध्या लग्नसराईचा मोठा हंगाम सुरू आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे फुलांची आवक घटली आहे, मात्र लग्नाकार्यात डेकोरेशन करण्यासाठी ओरिजनल फुलांचा आग्रह केला जात असल्याने फुलांची मागणी दुप्पट वाढली आहे. परिणामी लग्न खर्चातही वाढ झाली आहे, गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत बुलढाण्यात फुलांच्या किमतीत 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली असून, फुलांचा बाजार चांगलाच तेजीत आहे.. उन्हाळ्यामुळे बागांमध्ये फुलांचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटले आहे. लग्नसराईमुळे मागणी भरपूर आहे, परंतु आवक कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. सध्या ग्राहकांना वाढीव दरानेच फुले खरेदी करावी लागत आहेत.....
रायगडच्या माणगावमध्ये तरुणांच्या दोन गटात तुंबळ मारहाण झाली आहे. माणगाव मोर्बा रस्त्यावर निर्जन ठिकाणी झालेल्या या मारहाणीमध्ये तलवार आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये आफन जलगावकर या तरूणाच्या डोक्यावर तलवारी वार करण्यात आला असून त्याची प्रकृती गंभिर आहे. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हळदीच्या कार्यक्रमानंतर फोन करून निर्जन ठिकाणी बोलवुन हि मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे फिर्यादी आणि आरोपींमध्ये हिंदू मुस्लिम तरुणांचा समावेश आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच खासदार निलेश लंके दगडूशेठ गणपती बाप्पाच्या चरणी
निलेश लंके यांनी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
काल संध्याकाळी निलेश लंके यांना रुग्णालयातून देण्यात आला आहे डिस्चार्ज
निलेश लंके यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती
काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्यामुळे पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात निलेश लंके यांना करण्यात आला होता दाखल
उन्हाळी सुट्टीत मौज मजा करण्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणी समवेत आंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना करूळ जामदारवाडी धरणाच्या परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तन्वी अनंत माळकर, स्वरा संदीप सुर्वे आणि ऋतिका संतोष पाटील अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. एकूण ६ जण जामदारवाडी धरणावर अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघी जणी खोल पाण्यात बुडू लागल्या. सोबत असलेल्या इतर तिघांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन त्यांना बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पेपर फुटीप्रकरणी अटकेत असलेल्या धनंजय लोखंडेला अहिल्यानगर न्यायालयाने दिला दोन दिवसाचा ट्रांजिट रिमांड....
CBI ने लोखंडेला राहूरीतुन अटक केल्यानंतर कोर्टासमोर हजर करत मागितला होता ट्रांजिट रिमांड....
ट्रांजिट रिमांड मिळाल्याने आता धनंजय लोखंडेला CBI दिल्ली कोर्टात करणार हजर तर आज रात्रीच CBI निघणार दिल्लीला...
नाशिक मध्ये खैरनारला अटक झाल्यानंतर लोखंडेचा नावं आलं होत समोर....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.