Indian Muslims: भारतीय मुस्लिमांचा खरा राष्ट्रवाद, देशभक्तीचं जिवंत उदाहरण, पाहा स्पेशल रिपोर्ट

Indian Muslim Nationalism: पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिमांचा राष्ट्रवाद चर्चेचा विषय ठरलाय. याआधी प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादावर संशय घेतला जायचा, पण आता चित्र बदलताना दिसतंय.
Indian Muslims
Indian Muslimssaam tv
Published On

प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिमांच्या राष्ट्रवादावर प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिमांचा राष्ट्रवाद चर्चेत आलाय. त्याचं कारण काय? मुस्लीम नेत्यांनी काय भूमिका घेतलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

पाहिलंत.. भारताचा आत्मा असलेल्या पहलगाममध्ये धर्म विचारुन दहशतवाद्यांनी 26 भारतीयांची हत्या केली. आणि देशातील मुस्लीम समाजाचं मन कळवळलं. पाकिस्तानच्या नीच कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय मुस्लीम रस्त्यावर उतरले. तर काश्मीरच्या विधानसभेत आमदार मेहराज मलिकने पाकिड्यांना सुनावलंय. कधी नव्हे ते काश्मीरमध्येही दहशतवादविरोधी नारे देत पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आलाय.

Indian Muslims
Terrorists launch pad: दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पाकची पळापळ, सैन्याच्या बंकरमध्ये लपले अतिरेकी

एवढंच नाही तर पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांचा निषेध करण्यासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी शुक्रवारचं नमाज काळी फित बांधून अदा करण्याचं आवाहन केलं. तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध करत ही राजकारण करण्याची वेळ नसल्याची भूमिका घेत सरकारला पाठींबा दिलाय.

Indian Muslims
Pakistani Army: पाकिस्तानी आर्मी भारतीय सीमेच्या दिशेनं? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय मुस्लीमांच्या राष्ट्रवादावर शंका उपस्थित केली जात होती. एवढंच नाही तर काही महाभागांनी तर थेट मुस्लिमांकडून खरेदी न करण्याचं आवाहन केलं. मात्र मुस्लिमांनी पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण काश्मीर आणि मुस्लिमांशी संबंधित मुद्द्यांवरुन मोदींवर टीका करणारा मुस्लीम समाज आता देशासाठी आणि दहशतवादाविरोधात एकवटल्याचं चित्र आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे नापाक इरादे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com