Pakistani Army: पाकिस्तानी आर्मी भारतीय सीमेच्या दिशेनं? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

Indian Border :भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढताना दिसत असून, युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अशातच पाकिस्तानने भारतीय सीमेकडे रणगाडे पाठवले असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Pakistani Army
Pakistani Armysaam tv
Published On

भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्यातच आता पाकिस्तानने रणगाडे भारतीय सीमेच्या दिशेनं पाठवल्याचा व्हिडिओ समोर आलाय. खरंच पाकिस्तानने युद्धासाठी तयारी केलीय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

पाकिस्तानी रणगाडे भारताच्या दिशेनं चाल करतायत. एकामागून एक असे हे रणगाडे सीमेच्या दिशेनं जात असून, पाकिस्तानी आर्मी युद्धासाठी तयार असल्याचा दावा करण्यात आलाय.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव इतका वाढलाय की युद्ध कधीही होऊ शकतं अशीच स्थिती आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत पाकिस्तानी रणगाडे भारताच्या सीमेच्या दिशेनं जात असल्याचं दिसतंय. तसा दावा करण्यात आलाय. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इशारा भारताने दिलाय.

दहशतवाद्यांना शोधून शोधून त्यांना ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय. यामुळे दोन्ही देशांमधील एलओसीवरही तणाव वाढलाय. पण, हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आताचा आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला. त्यात रणगाडे वेगाने जात असल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र, हा व्हिडिओ आताचा आहे का? या दिशेनं तपास केला त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहुयात.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आढळून आला. या व्हिडिओता पहलगाम दहशतवादी घटनेनंतर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आमच्या पडताळणीत पाकिस्तान सैनिक रणगाडे घेऊन भारतीय सीमेच्या दिशेनं चाल करत असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com