

Mumbai News: धुळे (Dhule) जिल्ह्यातल्या मुंबई- आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) पळासनेर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात (Mumbai-Agra Highway Accident) मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने (Maharashtra Governement) मदत जाहीर केली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) जाहीर केली आहे. तसंच अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पळासनेर येथे मुंबई- आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. तसंच अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. तसंच, मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही दिले.
धुळे जिल्ह्यातल्या मुंबई- आग्रा महामार्गावर आज दुपारी १२ वाजता भरधाव कंटेनरचा अचानक ब्रेक फेल झाला. या कंटेनरने आधी कारला धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. या भीषण अपघातामध्ये कंटेनरखाली चिरडून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या अपघातामध्ये कार आणि ट्रकचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांच जागीच मृत्यू झाला होता. तर ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामधील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघातातील जखमींवर शासकीय आणि नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर आणि कारचा चक्काचूर झाला आहे. धुळे पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.