Dhule Accident CCTV Video: धुळे कंटेनर अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू, थरकाप उडवणारा VIDEO आला समोर

Dhule Container Accident: धुळ्यातील कंटेनरचा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
dhule container accident shocking cctv video
dhule container accident shocking cctv videoSaa Tv
Published On

Dhule Container Accident: धुळ्यातल्या मुंबई- आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजळ भीषण अपघाताची (Mumbai-Agra Highway Accident) घटना घडली. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ (Dhule Accident CCTV Video) समोर आला आहे. या अपघातामध्ये भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. या कंटेनरखाली चिरडून १३ जणांचा मृत्यू झाला. तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

dhule container accident shocking cctv video
Mumbai-Agra Highway Accident: धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, 13 जणांचा मृत्यू; 20 ते 25 जण जखमी

पळासनेर येथील मध्यप्रदेश राज्याच्या बॉर्डरवर मंगळवारी दुपारी बाराच्या वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरचा अचानक ब्रेक फेल झाला. त्यानंतर कारचा जोरदार धडक देत हा कंटेनर थेट रस्त्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर आणि कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

या अपघाताचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये दिसत आहे की, मुंबई -आग्रा महामार्गावर ट्रक उभा आहे. त्याबाजूने एक पांढऱ्या रंगाची कार जात आहे. त्याचवेळात पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये कारचे तुकडे तुकडे होऊन ती फेकली जाते. त्यानंतर हा कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसतो.

dhule container accident shocking cctv video
Rohit Pawar Tweet: रोहित पवार यांचा रोख नेमका कुणाकडे? नव्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

अवघ्या काही सेकंदातच होत्याचे नव्हते झाले. या भीषण अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामधील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अपघातातील जखमींवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाबाहेर जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर आणि कारचा चक्काचूर झाला आहे. धुळे पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com