MLA Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरी करत काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला. अजित पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह सर्वांना मोठा धक्का बसला.
अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशामध्ये आता या बंडखोरीचे सर्व खापर आमदार रोहित पवार यांनी थेट भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्यावर फोडले आहे. त्यांनी यासंदर्भात केलेले ट्वीट सध्या चर्चेत आले आहे.
रोहित पवार यांनी आज सकाळी ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी...मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी... आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी...' रोहित पवारांनी या ट्विटच्या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आधी शिवसेनेला फोडली त्यानंतर आता राष्ट्रवादीला फोडले असल्याचा आरोप त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केला आहे. भाजपकडून सुरु असलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणावर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्षे पूर्ण झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेना पक्षात बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला होता आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्या या निर्णयानंतर शिवसेना खिळखिळी झाली.
आता राष्ट्रवादीमध्ये देखील अजित पवारांनी तेच केले. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी ९ आमदार सोडले तर इतर सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.