वारकऱ्यांना मायेची सावली देणारा 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला, वृक्षासाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बदलली होती; पर्यावरणप्रेमी गहिवरले

400 year old banyan tree collapsed at bhose near sangli : एका झाडाला वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गात बदल करण्याची पहिली घटना हाेती. या वटवृक्षाच्या पर्यावरणप्रेमींनी आज पुन्हा काही आठवणी सांगितल्या.
400 year old banyan tree collapsed near at bhose near ratnagiri nagpur highway
400 year old banyan tree collapsed near at bhose near ratnagiri nagpur highwaySaam Digital
Published On

गेल्या चारशे वर्षांपासून वारकारी आणि वाटसरुंना मायेची सावली देणारा वटवृक्ष अखेर नुकताच कोसळला. सांगलीच्या भोसे नजीक रत्नागिरी- नागपूर महामार्गा लगत असणारा भला मोठा वटवृक्ष कोसळल्याने पर्यावणप्रेमींना हूरहूर लागली आहे.

रत्नागिरी नागपूर महामार्ग बनवताना हा वटवृक्ष काढून टाकण्यात येणार होता. सांगली येथील पर्यावरणप्रेमींनी वटवृक्ष वाचवण्याची मोहिम सुरू केली होती. या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील सहभाग घेतला होता.

400 year old banyan tree collapsed near at bhose near ratnagiri nagpur highway
Dharashiv Rain : धाराशिवला पावसाने झाेडपलं, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात शिरलं पाणी, फकीरा नगरातील रहिवाशांची बिकट स्थिती

त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीतील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आंदोलनाची दाखल घेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वटवृक्ष वाचवण्याची विनंती केली होती. गडकरींनी त्यास समंती दिली. त्यानंतर वटवृक्ष वाचवण्यासाठी चक्का महामार्गाची दिशा बदलण्यात आली हाेती. दरम्यान पावसामुळे अखेर हा वटवृक्ष उन्मळून पडला आहे.

Edited By : Siddharth Latkar

400 year old banyan tree collapsed near at bhose near ratnagiri nagpur highway
Sambhajinagar: शेतकऱ्यांनो सावधान, जाहिरातींना भुलू नका; संभाजीनगरात बाेगस बियाणे विक्रेत्यांवर कृषीची नजर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com