Sangli News,  Leopard
Sangli News, LeopardSaam tv

3 Year Old Leopard Dies : ग्रामस्थांना दिलासा... शेत शिवारात फिरणा-या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

ऐतवडे खुर्द ग्रामसभेत ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी झाली होती.
Published on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे ऐतवडे खुर्द मुख्य रोडवरील देवर्डे हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तीन वर्षाच्या नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. हा प्रकार आज (बुधवार) सकाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या निर्दशनास आला. (Maharashtra News)

Sangli News,  Leopard
Khambatki Ghat Accident : काेल्हापूरकरांनाे ! पुण्याला निघालात? जाणून घ्या पुणे-बंगळुरू महामार्गाची Traffic Update

गेल्या आठ दिवसांपासून कुरळप फाटा ते चिकुर्डे रोडवरील दत खडी परिसरात नागरिकांना, शेतक-यांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होत हाेते. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण होते. वन विभागाला याबाबत वारंवार सूचना देऊन देखील याबाबत संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते.

Sangli News,  Leopard
Shravan Mass 2023 : व्हीआयपी दर्शन सुविधा बंदनंतर भाविकांसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानचा आणखी एक माेठा निर्णय; ग्रामस्थांनाे! जाणून घ्या नियमावली

ऐतवडे खुर्द सह करजंवडे देवर्डे कुरळप आदी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मंदिराच्या आसपास बिबट्याचे सातत्याने दर्शन होत हाेते. बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास एक शेतकरी शेतात काम करत असताना अचानक समोरून आलेल्या बिबट्याने त्यांची धादंल उडाली.

Sangli News,  Leopard
Ravikant Tupkar vs Raju Shetti : असं काय लिहिलं रविकांत तुपकरांनी... शिस्तपालन समितीला राजू शेट्टींनाच धाडावं लागलं पत्र

या परिसरात असणाऱ्या शेत वस्ती वरील कुत्र्यांना बिबट्याने आपले लक्ष केले हाेते. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कुत्र्यांचा, रेडकांचा फडशा पाडला. रात्री अपरात्री शेत वस्तीकडे जाताना शेतकऱ्यांना बिबट्या सातत्याने दिसत आहे. ऐतवडे खुर्द ग्रामसभेत ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी झाली होती.

दरम्यान बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची बातमी पसरताच चिकुर्डे देवर्डे ऐतवडे खुर्द व कुरळप परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com