Beed Crime
Beed Crimeविनोद जिरे

खळबळजनक! 23 वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ

बीडच्या बनसारोळा गावातील घटना
Published on

बीड: गेल्या काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. तर आज पुन्हा एकदा बीडच्या बनसारोळा गावात, एका 23 वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुभम फुलचंद जोगी असं आत्महत्या (self-slaughter) केलेल्या तरुणाचे नाव आहे.

हे देखील पहा-

केज (Kej) तालुक्यातील बनसारोळा येथे शुभम फुलचंद जोगी या 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह घरातील आडुला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. दरम्यान याप्रकरणी युसूफवडगाव (Yusufwadgaon) पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. यानंतर तात्काळ पोलिसांना (police) या घटनेची माहिती दिली.

Beed Crime
Varanasi Encounter: वाराणसीत दिवसाढवळ्या पोलिसांकडून गुंडाचा एन्काऊंटर

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. या घटनेने मात्र गावात (village) शोककळा पसरली आहे. दरम्यान शुभमने आत्महत्या केली की कुणी त्याची हत्या केली? याचा तपास युसूफ वडगाव पोलिस सध्या करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com