Varanasi Encounter: वाराणसीत दिवसाढवळ्या पोलिसांकडून गुंडाचा एन्काऊंटर

उत्तर प्रदेशमध्ये २५ मार्च दिवशी योगी सरकार दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे.
Varanasi Encounter
Varanasi EncounterSaam Tv
Published On

वाराणसी: उत्तर प्रदेशमध्ये २५ मार्च दिवशी योगी सरकार (Government) दुसऱ्यांदा विराजमान होणार आहे. पण त्याअगोदरच गुन्हेगारांविरोधामधील फास आवळण्यास पोलिसांनी (police) सुरुवात केली आहे. गुन्हेगाऱ्यांचा काळ्या कमाईवर बुल्डोजर चालवल्यावर आता फरार आरोपींचा (accused) थेट एन्काऊंटर (Encounter) करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वाराणसीमध्ये (Varanasi) दिवसाढवळ्या २ लाखांचे बक्षीस असलेल्या गुंड मनीष सिंह सोनू याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला आहे. (Hooligan encounter police Varanasi broad daylight)

मनीष सिंह सोनू याच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याचा अखेर आज उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स मार्फत खात्मा (killing) करण्यात आला आहे. एनडी तिवारी हत्याकांडाबरोबरच अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मनीष सिंह सोनू याचा सहभाग होता. त्याच्यावर जौनपूर, गाजीपूर, वाराणसी आणि चंदौली येथे एकूण मिळून २४ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

हे देखील पहा-

मागील अनेक वर्षांपासून फरार होता

मनीष सिंह सोनूचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला बक्षीस स्वरुपात २ लाख रुपये दिले जाणार असे अलिकडेच जाहीर करण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून तो फरार होता. २८ ऑगस्ट २०२० दिवशी मनिष सिंह याने चौकाघाट येथे दिवसाढवळ्या हिस्ट्रीशीटर अभिषेक सिंह प्रिंस यांच्याबरोबरच २ जणांची हत्या केली होती. याअगोदर मनिष सिंह आझमगढ येथील एका सराफा व्यावसायिकाची लूटमार आणि खून प्रकरणात फरार होता.

यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये मिर्झापूरच्या चुनार येथील कंपनी अधिकाऱ्याकडून खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात मनीष सिंग सोनूचे नाव समोर आले होते. नोव्हेंबर २०२० मध्ये पोलिसांनी मनिषला जैतपुरा परिसरात घेरले होते. या चकमकीमध्ये रोशन गुप्ता उर्फ ​​बाबू उर्फ ​​किट्टू हा मारला गेला होता, तर मनीष पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

Varanasi Encounter
कुचिक प्रकरण: भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पुणे पोलीस करणार चौकशी

सोनू हा नेहमी बिहार आणि नेपाळमध्ये लपून बसत होता

नोव्हेंबर २०२० नंतर पोलीस (Police) सोनू याचा मागोवा घेत होते. पण तो काही हाती लागत नसायचा. यूपी (UP) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष बिहार आणि नेपाळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. तो सतत त्याचे ठिकाण बदलत होता. जवळपास दीड वर्षांनंतर पोलिसांना मिळालेल्या टिपनुसार सोनू आज वाराणसीत असल्याचे कळले होते. सोनूची माहिती मिळताच यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या टीमने त्याला घेरले. यावेळी मनिष सिंह याने पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. पण पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये तो गोळीबारात ठार झाला आहे. त्याच्याकडून ९ एमएम कारबाइन, ३२ बोरची पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशामध्ये भाजपा सरकारचे पुनरागमन नंतर हा पहिलाच मोठा एन्काऊंटर आहे. ज्यामध्ये एक मोस्ट वॉन्टेड गुंड ठार करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com