Talathi Bharti Exam: हसायचं की रडायचं... 200 मार्कच्या पेपरमध्ये 214 मार्क, जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

Talathi Bharti 2023 Exam Paper News: या सरकारचं नाव घोटाळेबाज सरकार आहे. कर्नाटक मध्ये 40 टक्के कमिशन घेत होते इथे 50 टक्क्यांचावचा रेट आहे. 200 मार्कचे पेपर मध्ये 214 मार्क पडतात आता हसायचं की रडायचं, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Jitendra Awhad on Talathi Bharti Exam
Jitendra Awhad on Talathi Bharti ExamSaam Digital
Published On

Talathi Bharti 2023

या सरकारचं नाव घोटाळेबाज सरकार आहे. कर्नाटक मध्ये 40 टक्के कमिशन घेत होते इथे 50 टक्क्यांचावचा रेट आहे. 200 मार्कचे पेपर मध्ये 214 मार्क पडतात आता हसायचं की रडायचं. सेटिंग लावायची, कटिंग करायचं, फिटिंग करून घ्यायची असा घणाघाती आरोप जितेंद्र आव्हाड यांनी युती सरकारवर केला आहे. तलाठी भरती परिक्षांवर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी पदाची शोभा घालवली

आज खरं वाटतंय आहे चार वाजता सुनावणी आहे. अध्यक्ष महोदयांनी भेटीगाठी घेऊन त्या पदाची शोभा कमी करून टाकली आहे. विधानसभा अध्यक्षपदाला एक वेगळीच उंची आहे. ते सांभाळण्याचं काम अध्यक्षांनी करायला हवं होतं. अध्यक्ष महोदय उठून कोणाच्याही घरी जातात हे कधीही बघितलेलं नाही. लोक अध्यक्षांना भेटायला येतात ते मात्र तेवढेच खरं आहे. महाराष्ट्रात राम व शास्त्री यांचे विचार... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार, विचारात घेतले जातात की नाही प्रश्न असल्याचं ते म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jitendra Awhad on Talathi Bharti Exam
Talathi Bharti 2023: तलाठी भरती रद्द होणार? परीक्षेत मोठा घोटाळा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com