HSC Board Exam
HSC Board Exam Saam Tv

HSC Hall Ticket: १२वीच्या परीक्षेला उरला अवघा १ महिना, आजपासून हॉल तिकीट देण्यास सुरुवात

HSC Exam Hall Ticket Distribution From Today: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉल तिकीट देण्यास सुरुवात होणार आहे.
Published on

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यी अभ्यासाला लागले आहेत. दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेला फक्त १ महिना बाकी आहे. जानेवारी महिन्यात त्यांची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. (12th Exam Hall Ticket)

HSC Board Exam
Government Scheme: लाडकी बहीण योजनेसारखेच 'या' योजनांचे पैसेही थेट बँक खात्यात जमा होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने दहावी- बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेचे हॉल तिकीट आजपासून दिले जाणार आहे.

सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे. तुम्ही 'www.mahahsscboard.in ' या संकेतस्थळावरुन आजपासून अॅडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड करता येणार आहे. (12th Exam Hall Ticket Distribution)

बारावी हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. आता बारावीच्या परीक्षेला फक्त १ महिला उरला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे टेन्शन वाढले आहे. बारावीची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही जानेवारी महिन्यातच होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा पूर्ण वेळ हा अभ्यासात जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच सराव करायला सुरुवात केली पाहिजे.

HSC Board Exam
Post office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! महिना ११५ रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काही महिन्यातच पैसे होतील डबल

बारावीची परीक्षा ही ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करायला हवा. बारावीच्या निकालानंतरच विद्यार्थ्यांना पुढे पदव्युतर शिक्षणासाठी संधी उपलब्ध होतात. त्यामुळे चांगले गुण मिळाल्यास चांगल्या कॉलेजलादेखील अॅडमिशन मिळेल.

HSC Board Exam
e-Shram Scheme: ई-श्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या विविध फायदे आणि नोंदणी प्रक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com