
BPSC Student Protest: बिहारची राजधानी असलेल्या पटनामध्ये बीपीएससी परीक्षा देण्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पटन्यातील गर्दनीबाग येथे हे विद्यार्थी मागील पंधरा दिवसांपासून बीपीएससीची ७० वी पीटी परीक्षा रद्द करावा अशी सरकार आणि आयोगाकडे मागणी करत आहेत. परीक्षेसंबंधित निर्णय ४८ तासात घ्यावा अशा इशारा विद्यार्थ्यांनी सरकारला दिला होता. या एकूण प्रकरणामुळे बिहारच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
बीपीएससीच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे म्हणत पीटी परीक्षा रद्द करावी अशी मागणी विद्याथ्यांनी केली होती. यासाठी त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर जन सुराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी गांधी मैदानात विद्यार्थी संसद बोलावली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मिळून सीएम हाऊसकडे कूच केले. तेव्हा आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.
या प्रकरणावरुन राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी प्रशांत किशोरांवर टीका केली. त्यावर पुढे प्रशांत किशोर यांनी प्रत्युत्तर दिले. पुढे एका नव्या वादाला सुरुवात झाली. विद्यार्थी आंदोलनामुळे नितीश कुमार यांच्यावरही दबाव आला असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह बिहारमधील विरोधी पक्षाने या आंदोलनात उडी घेतली आहे. यामुळे आंदोलनाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे असे म्हटले जात आहे.
बीपीएससीची परीक्षा रद्द होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. तेव्हा परीक्षेबाबत सरकारने निर्णय घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांनी आग्रह धरला. पण पुढे सरकारनेही परीक्षेचा निर्णय आयोगाने घ्यावा असे म्हटले. यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. आज हा अल्टिमेटम पूर्ण झाला आहे. आता या प्रकरणावर विद्यार्थी पुढे काय करतील आणि त्यावरुन बिहारच्या राजकारणावर कसा परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.