Medicines: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! 'ही' 100 औषधं स्वस्त होणार, केंद्र सरकारचा निर्णय

Medicines Became Cheaper: केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं अनेक औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Medicines
MedicinesSaam Tv
Published On

Health Care Costs Will Come Down

केंद्र सरकारने अनेक औषधांचे दर (Medicine Rate) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. संसर्ग, ताप, कोलेस्ट्रॉल तसंच शुगरसह 100 औषधे स्वस्त होणार आहेत. NPPA म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. यामुळं औषधांच्या दर कमी होत आहेत. (Latest Marathi News)

सध्या देशात आजारांवर उपचार करणं खूप महाग होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं हा सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शुगर, कोलेस्टेरॉल, अंगदुखी, संसर्ग, ताप, अतिरक्तस्राव, व्हिटॅमिन डी3, लहान मुलांची अँटिबायोटिक्स, कॅल्शियम यासह 100 औषधे स्वस्त (Medicines Became Cheaper) होतील. त्यामुळं लोकांचा आरोग्यसेवेवरील खर्च कमी होणार आहे. औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी 69 फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत, NPPA ने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमका नवीन निर्णय काय?

NPPA India ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. याबाबत अधिसूचना देखील जारी केलेली (Health Care Costs) आहे. भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाच्या NPPA ने अधिसूचना जारी केली आहे.

वेदना, कोलेस्टेरॉल, मधुमेह, ताप, अतिरक्तस्त्राव थांबवणे, संसर्ग, कॅल्शियम, लहान मुलांसाठी अँटीबायोटिक्स, व्हिटॅमिन डी3 यासह अँटीवेनम औषधंही स्वस्त होणार आहे. सर्पदंशावर उपचारासाठी अँटीवेनमचा वापर केला जातो. NPPA च्या नवीन ऑर्डरमुळे 100 औषधे स्वस्त होणार आहे. यामुळे आता उपचार करणं स्वस्त होणार आहे.

Medicines
Cancer Medicine : भारतीय मसाले करणार कॅन्सरवर मात...; संशोधनात समोर आली आश्चर्यकारक माहिती

सर्वसामान्यांना मोठा दिलासा

अर्थसंकल्पानंतरच सरकारने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांसाठीही दिलासादायक बातमी (medicine costs) आली आहे. सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने साखर, वेदना, ताप, हृदय, सांधेदुखी कमी करणारे तेल आणि संसर्गावरील औषधे स्वस्त केली आहेत. त्यानंतर एजन्सीने 4 विशेष फीचर उत्पादनांनाही मान्यता दिली होती.

कोरोना महामारीनंतर औषधांच्या किमती आणि वैद्यकीय खर्चात दुपटीहून अधिक वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे, अशा परिस्थितीत सरकारने फेब्रुवारीच्या सुरुवातीला औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला. महिनाभरात दुसऱ्यांदा औषधांच्या किमतीत कपात केल्याने सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.

Medicines
Medicines : औषधाच्या गोळ्या रंगीबेरंगी का असतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com