Assembly Election: आम्ही आमची निवडणूक लढतोय; वरळीत शिंदे गटाला पाठिंबा नाही - राज ठाकरे

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही दादरच्या बालमोहन शाळेत जाऊन मतदान केलं आहे. यावेळी त्यांनी वरळीमध्ये शिंदे गटाला असलेल्या पाठिंब्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Raj Thackeray
Assembly Electionsaam tv
Published On

Maharashtra Assembly Election: मतदानानंतर राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, वरळीमध्ये कोणताही पाठिंबा शिवसेना शिंदे गटाला दिलेला नाही. आम्ही आमची निवडणूक लढवतो. गुढीपाडव्याच्या सभेत मी सांगितलं होतं की, या निवडणूकीमध्ये खूप गोंधळ होतील,चित्र विचित्र गोष्टींचे वापर होतील, त्याचप्रमाणे गोष्टी होतायत. बाकीच्यांनी माती खायचीये त्यांनी गेल्या ५ वर्षांमध्ये खाल्ली आहे. लोकं या गोष्टींना भुलणार नाहीत.

पैशांच्या वाटपाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पैशांचा वापर होतच होता, मात्र सध्या खूप उघडपणे होतोय. ज्यांनी गेल्या ५ वर्षांमध्ये तुमच्या मताचा अपमान केला आहे त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे.

'मतदान कमी केल्यानं आपल्या पदरी काय कमी येईल याचा विचार केला पाहिजे. आपलं मत व्यक्त करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वांनी मतदान केलं पाहिजे. आपलं मत व्यक्त करण्यापासून बाजूला हटलं हा पर्याय नाहीये, असं म्हणत राज ठाकरे यांनी सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यास सांगितला आहे.

Raj Thackeray
Assembly Election: विरोधकांनी आमीष दाखवलं तरी जनता आमच्यासोबतच; मतदानानंतर हितेंद्र ठाकूर यांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्रात नऊ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

पहिल्या दोन तासांत महाराष्ट्रात 6.61 टक्के मतदान पार पडलं आहे. गडचिरोलीमध्ये 12.33 टक्के मतदान झालं आहे. तर, संभाजी नगर जिल्ह्यात अवघं 7.5 टक्के मतदान पार पडलं आहे.

Raj Thackeray
Assembly Election: सगळ्यांनी या, मतदान करा...! सचिन तेंडुलकरने पत्नी, मुलीसह बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांनाही केलं आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com