Vinod Tawde: विनोद तावडेंची माहिती भाजपच्या प्रमुख नेत्यानेच दिली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Vinod Tawde: विनोद तावडे विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप बविआ नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर विनोद तावडे यांना अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
Vinod Tawde:  विनोद तावडेंची माहिती भाजपच्या प्रमुख नेत्यानेच दिली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Vinod Tawde
Published On

Vinod Tawde Distributing Money: भाजपच्या लोकांनी किती लपवायचा प्रयत्न केला तरी, जे केलंय ते कॅमेऱ्यासमोर आहे. भाजपचा खरा चेहरा उघड झालाय. त्यांचा खेळ संपला. विनोद तावडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. त्यांच्याकडे पाच कोटी सापडले. महाराष्ट्राच्या निवडणिुकीत प्रत्येक मतदारसंघात १५ तै २० कोटी पकडले. मुंबईत ठाण्यातून पैसे वाटपासाठी माणसे नेमली आहेत. ईशान्य मुंबई आहे. तेथे शिंदेंचा माणूस आहे. तो रात्री उशिरा पैसे घेऊन येतो. पैसे वाटप करून पुन्हा ठाण्यात जातो. २३ तारखेनंतर राम रेपाळेचा काय करायचं आहे ते बघणार आहे.

पण विनोद तावडे स्वतः पैसे वाटतात हे आश्चर्य आहे. आमच्या बॅगा, विमानं, हेलिकॉप्टर, गाड्यांच्या डीगी उघडतात. आमच्या मागे जो ससेमिरा लावलाय. पण भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या मागे लावला असता तर किमान १ हजार कोटी रुपये मिळाले असते. तिजोरीत गेले असते.

ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करायला हवं. सत्ताधारी पक्षाकडून कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवली जाते हे समोर आले आहे. उद्धव ठाकरे संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या घटनेवर ते बोलणार आहेत.

Vinod Tawde:  विनोद तावडेंची माहिती भाजपच्या प्रमुख नेत्यानेच दिली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Hitendra Thakur : बॅग, डायरी आणि १०,००,००० रुपयांची रोकड; हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं नेमकं काय घडलं? वाचा

विनोद तावडे यांच्यासंदर्भातील माहिती आहे ती भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यानं दिली आहे अशी माहिती माझ्याकडे आहे. त्यांना पकडून देण्यासाठी हे भाजपच्या नेत्यानंच कारस्थान केलंय.

विनोद तावडेंची माहिती भाजपच्याच नेत्यानं दिली, हितेंद्र ठाकूरांचा दावा

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. विनोद तावडेंना विरारमधील विवांता हॉटेलमध्ये घेराव घालण्यात आलाय. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांनी तावडे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप केलाय. मात्र विनोद तावडेंनी आरोप फेटाळून लावलाय.

Vinod Tawde:  विनोद तावडेंची माहिती भाजपच्या प्रमुख नेत्यानेच दिली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Vinod Tawde Money Distribution : १५ कोटी वाटल्याचा तावडेंवर आरोप, विरोधक म्हणतात मान्य करा; भाजप म्हणाले, पैसे वाटायला जातीलच का

पण तिथे काही डायऱ्या सापडल्या असून त्यात काही नोंदी असल्याचाही दावा बविआने केलाय. तावडेंनी २५ वेळा मला फोन केल्याचा दावा केलाय. त्याशिवाय तावडे येथे आल्याची माहिती भाजप नेत्यांनीच दिल्याचा दावाही हितेंद्र ठाकूर यांनी केलाय.

भाजपच्या लोकांनीच सांगितलं की ते ५ कोटी घेऊन येतील. इकडे पैसे वाटप सुरू आहे. डायऱ्या आहेत. निवडणूक आयोग आणि पोलीस विभागाने योग्य ती कारवाई करावी. आम्ही आल्यावर सीसीटीव्ही चालू केला. आधी बंद होता.या हॉटेलवाल्यावर कारवाई केली पाहिजे. पैसे वाटपामुळं सीसीटीव्ही बंद केले होते,असा आरोपही ठाकूर यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com