राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांनी तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र शाळांना सरसकट सुट्टी नसल्यांची माहिती शिक्षण विभागाने दिलीय. प्रत्येक शाळांमधील मुख्याध्यापकांनी शाळांना सुट्टी देण्याचा विचार करावा, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आलेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी तारीख २० मतदान होत आहे. त्यामुळे सोमवारी तारीख १८ आणि मंगळवारी ता. १९ शाळांना सरसकट सुट्टी नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिले. निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना पुढील आठवड्यात सोमवारी ते बुधवार दरम्यान सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय आवश्यकतेनुसार त्या-त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी घ्यावा, असा आदेश देणारे परिपत्रक शिक्षण विभागाने गुरुवारी काढले होते.
परंतु, त्यानंतर शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे अखेर शिक्षण आयुक्तांना याबाबत स्पष्टीकरण करणारे परिपत्रक शुक्रवारी काढावे लागले. शिक्षण विभागाने गुरुवारी परिपत्रक काढल्याने शाळांना सोमवारी (ता. १८) आणि मंगळवारी (ता. १९) सुट्टी जाहीर करण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले. परंतु ही कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
या संदर्भात गुरुवारी दिलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.
अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील. केवळ वरील परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापकांनी सुट्टी द्यावी, अशा सूचना आहेत. ही सरसकट आणि सार्वजनिक सुट्टी नाही, याची नोंद सर्वांनी घ्यावी, असे मांढरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यात कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत, याचीही सर्व शिक्षणाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या ड्युटीला स्कूल बसला लावण्यात आले आहे. राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या सूचनेनुसार निवडणुकीच्या कामांसाठी १९ आणि २० नोव्हेंबरला स्कूल बसची आवश्यकता आहे. त्यामुळे १९ आणि २० नोव्हेंबर या दोन दिवशी या बस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी न चालविण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र घेतला आहे. मतदानामुळे शाळांना २० तारखेला सुट्टी आहे.
मात्र १९ तारखेला बसअभावी विद्यार्थ्यांना पायपीट करत जावे लागेल. सार्वजनिक बस, रिक्षा, टॅक्सीने शाळेत ये-जा करावी लागणार आहे. या बस १८ नोव्हेंबरलाच रात्रीपासून आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी १९ नोव्हेंबरला उपलब्ध करून देणे कठीण असल्याने हा निर्णय घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.