Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात पोलिस दल आणि आयटीबीपीच्या जवानांकडून ही नाकाबंदी करण्यात येत आहे
Published on

जळगाव : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पोलिसांकडून नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत आहेत. दरम्यान जळगाव शहरात पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये आज वीस लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. सदरची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. 

जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यात पोलिसदल आणि आयटीबीपीच्या जवानांकडून ही नाकाबंदी करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या नाका बंदीमधे आज वीस लाख रुपयांची पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

(Vidhan Sabha Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून संपुर्ण जळगाव जिल्ह्यात पोलिस दल आणि आयटीबीपीच्या जवानांच्या कडून ही नाकाबंदी करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jalgaon News
Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

जिल्ह्यात आतापर्यंत चार कोटींची रक्कम सापडली 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील पंधरा दिवसात जिल्ह्यात चार कोटी रुपयांची रोकड मिळून आले आहेत. तर अवैध दारू गुटख्यासह दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत पोलिसांनी जप्त केला आहे. जळगाव जिह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या रक्कमेमुळे खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com