Bjp Candidate List: भाजपच्या  उमेदवारांच्या पहिल्या यादीतील 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष, जाणून घ्या ५ मोठ्या गोष्टी
Bjp Candidate Listyandex

Bjp Candidate List: भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीतील 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष, जाणून घ्या ५ मोठ्या गोष्टी

Assembly Election: भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्र निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 13 महिला आणि 10 SC/ST उमेदवारांना तिकीट मिळाले आहे. भाजपच्या यादीतील 5 मोठ्या गोष्टी जाणून घ्या.
Published on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून राजकीय पक्षांनी निवडणुकीत सर्व ताकद पणाला लावली आहे. जागावाटपानंतर राजकीय पक्षांकडून आता उमेदवारांच्या घोषणा केल्या जात आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात रंजक लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान भाजपने महाराष्ट्र निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीबद्दल ५ मोठ्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

१) माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीला उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी दिलीय. याआधी अशोक चव्हाण यांनीही भोकर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Bjp Candidate List: भाजपच्या  उमेदवारांच्या पहिल्या यादीतील 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष, जाणून घ्या ५ मोठ्या गोष्टी
Pune Assembly Election: पर्वतीतून मिसाळ यांना चौथ्यांदा उमेदवारी; कोण आहेत माधुरी मिसाळ, जाणून घ्या

२) १३ महिलांना उमेदवारी

भाजपच्या पहिल्या यादीत १३ महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आलायं. चिखलीतून श्वेता महाले, भोकरमधून श्रीजया चव्हाण, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, फुलंबारीतून अनुराधा चव्हाण, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आलीय .

कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहिसरमधून मनीषा चौधरी, गोरेगावमधून विद्या ठाकूर, पार्वतीमधून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजले, श्रीगोंदामधून प्रतिभा पाचपुते, कैजमधून नमिता मुंदडा यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

Bjp Candidate List: भाजपच्या  उमेदवारांच्या पहिल्या यादीतील 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष, जाणून घ्या ५ मोठ्या गोष्टी
Manoj Jarange Patil: महायुती, मविआचा कार्यक्रम करायचाय; मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी दोन्ही आघाड्याविरोधात थोपटले दंड

३) SC/ST उमेदवारांना संधी

भाजपने ९९ पैकी १० SC/ST उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय. सहा अनुसूचित जमाती आणि ४ अनुसूचित जातीचे उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

४) आमदाराचं तिकीट कापलं

भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. पक्षाने कल्याण पूर्व मतदारसंघातून गणपत गायकवाड यांचे तिकीट रद्द करून त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय.

५) सुरक्षित मतदारसंघ

भाजपने नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी मिळालीय. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. या जागेवरून सध्या भाजपचे टेकचंद सावरकर आमदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com