Manoj Jarange Patil: महायुती, मविआचा कार्यक्रम करायचाय; मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी दोन्ही आघाड्याविरोधात थोपटले दंड

Assembly Election : मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. काही दिवसात कुठे उमेदवार द्यायचा आणि कुठे नाही याचा निर्णय ते घेणार आहेत.
Manoj Jarange Patil: महायुती, मविआचा कार्यक्रम करायचाय; मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी दोन्ही आघाड्याविरोधात   थोपटले दंड
Manoj Jarange-PatilSaam Tv
Published On

प्रत्येक मतदारसंघात मराठ्याचं एक लाख मतदान आहे. माझा विश्वासघात होऊ नका देऊ, मला एकटे नका पाडू , असं आवाहन करत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं. निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतांना जरांगे यांनी महायुती आणि मविआचा पान उतार केलाय. उमेदवार दिले नाही दिले तरी राजकीय पक्ष आनंदी होतील असं जरांगे म्हटलेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रर्वगातून आरक्षण द्यावे, सगे सोयऱ्यांचा मुद्दा शासकीय जीआरमध्ये उल्लेख करावा ,अशी मागणी जरांगे केली. राज्यात आचारसंहिता लागण्याआधी सरकारने हा निर्णय घ्यावा अशी जरांगेंनी मागणी केली होती. निवडणुका जाहीर होत राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर जरांगेंनी थेट निवडणुकीच्या मैदानातून विरोधकांना आव्हान देण्याचं आणि सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावर आणण्याचं ठरवंल. निवडणुकीत उतरायचं की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाशी चर्चा करत आपला निर्णय जाहीर केला.

Manoj Jarange Patil: महायुती, मविआचा कार्यक्रम करायचाय; मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी दोन्ही आघाड्याविरोधात   थोपटले दंड
Maharashtra Politics : फॉर्म भरा, मी समीकरण जुळवतो, मनोज जरांगेंनी रणशिंग फुंकले, मराठ्यांना दिला आदेश!

आपण उभे राहिले की भाजप वाले खुश होतील. आणि उभे नाही केले तर महाविकास आघाडी वाले खुश होतील. महायुती आणि मविआ आरक्षण देऊ असं म्हणत नाहीत. दोन्ही नाठाळ असल्याचा टोलाही त्यांनी जरांगे यांनी लगावला. दोन्ही म्हणजेच महायुती आणि मविआकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात नाहीत. ते एकमेकांच्या उमेदवारांच्या नावाची वाट पाहत बसलेत.

परंतु त्यांनी उमेदवार दिले तर ते पडतील हे निश्चित कारण प्रत्येक मतदारसंघात एक लाख मराठा समाजाचे मतं आहेत. तसेच कुठल्या पक्षासोबत जाण्यावरून जरांगे म्हणाले, आपल्या हाताने आपण संपू नये म्हणून वेगळा मार्ग काढला पाहिजे. कारण आपल्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढलीय. आपण गाफील राहिलो तर अवघड असल्याचं म्हटलंय.

Manoj Jarange Patil: महायुती, मविआचा कार्यक्रम करायचाय; मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी दोन्ही आघाड्याविरोधात   थोपटले दंड
Maharashtra Politics: फडणवीसांच्या विश्वासू आमदाराचं तिकीट कटणार? माळशिरसमध्ये भाजप नवा डाव टाकण्याच्या तयारीत

त्याचेवळी त्यांनी निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्यांनात्यांना एक सल्ला दिला. पक्षा नेत्याकडून बोलू नका समाजाकडून बोला. आपण सर्वांचे उमेदवार बघायचे. त्यानंतर उमेदवार द्यायचे. आपण कुठं निवडून येऊ शकतो. दलीत मुस्लिम एकत्र आहेत का असं समीकरण जुळवून घ्यावेत असेही जरांगे म्हणालेत. जिथे उमेदवार निवडून येतील तेथून उमेदवार द्यायचाय. राखीव जागेवर उमेदवार देऊ नये. पाच ते सहा दिवसात कोणत्या मतदरसंघातून काय करायचे. त्याची माहिती देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com