महायुतीत जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे. त्याच दरम्यान भाजपमध्ये मात्र मोठी घडामोड होत आहे. आज उमेदवारांची यादीदेखील जाहीर होण्याची शक्यता आहे. तर उमेदवारी मिळणार नसल्याचं चित्र दिसत असल्याचं समजताच इच्छुक उमेदवार आपले राजीनामे देत आहेत, त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यात भाजपची याच कारणामुळे चिंता वाढवलीय.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघात आता भाजप अलर्ट मोडवर आलाय. संविधान बदलणार या महाविकास आघाडीच्या अपप्रचाराचा चेहरा उघडा पाडण्यासाठी अनुसूचित जातीचा उमेदवार देण्याचा भाजपकडून विचार सुरू आहे. माळशिरस मधून अतुल सरतापे यांचे नाव आघाडीवर आहे.
महाविकास आघाडीकडून उत्तम जानकर यांची उमेदवारी निश्चित असताना त्यांच्यापुढे आव्हान देण्यासाठी भाजपमध्ये अद्याप उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यासह माळशिरसमधील स्थानिक तसेच अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून भाजपमधील काही नेत्यांनी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस अतुल सरतापे यांच्या नावाचा आग्रह धरलाय. त्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केलीय.
माळशिरसमध्ये स्थानिक आणि मूळ अनुसूचित जातीचा उमेदवार दिला तर या ठिकाणी येथील अनुसूचित जातीचा मतदार भाजपसोबत येईल अशी आशा भाजपला आहे. त्यामुळे राम सातपुते यांच्याशिवाय अतुल सरतापे हे पर्याय ठरू शकतात का ? अशी चाचपणी सुरू आहे.
बीडमधील राजकारणदेखील पेटलंय. येथे निवडणुकीत लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यामुळे स्थानिक पातळीवरील भाजपमध्ये खळबळ माजलीय.
बीडमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पहिल्या टर्मनंतर सलग दुसऱ्या टर्ममध्ये राजेंद्र मस्के यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान राजेंद्र मस्के हे बीड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र निवडणुकीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच मस्केंनी राजीनामा दिल्याने मस्के यांच्या मनामध्ये नेमक चाललय काय ? ते कोणत्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार की अपक्ष उभा राहणार या सर्व विषयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.