Raj Thackeray: मविआत गेले आणि हिंदूहृदयसम्राट गायब झाले; उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचे फटकारे

Maharashtra Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्याच सभेतून राज ठाकरेंनी टीकेचे फटाके फोडले. मनसे उमेदवार राजू पाटील यांच्यासाठी डोंबिवलीमध्ये घेण्यात आलेल्या प्रचारसभेपासून राज ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी मविआसह महायुतीवर जोरदार टीका केली.
Raj Thackeray: मविआत गेले आणि हिंदूहृदयसम्राट गायब झाले; उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचे फटकारे
Raj Thackeray
Published On

उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याबरोबर सगळ्या फोटोवरून आणि बॅनरवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोरील हिंदू हृदयसम्राट हे काढून टाकण्यात आलं. स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंनी पातळी सोडल्याची टीका राज ठाकरेंनी केली. ते डोंबिवलीमधील प्रचारसभेत बोलत होते. मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्यासाठी प्रचारसभा डोंबिवलीमध्ये घेण्यात आली. यावेळी मनसेचे सर्वच उमेदवार उपस्थित होते.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु विधानसभेसाठी राज्यात २२५ जागा लढविण्याची घोषणा त्यांनी एका मेळाव्यात केली होती. त्या घोषणेनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा करत इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. मनसेने १३५ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.

Raj Thackeray: मविआत गेले आणि हिंदूहृदयसम्राट गायब झाले; उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचे फटकारे
Assembly Election: पुणे जिल्ह्यात ३०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, किती जणांनी घेतली माघार?

आज मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी डोबिंवलीत सभा घेतली. या सभेपासून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. प्रचाराचा नारळ फोडताच राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. फक्त मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी मतदारांच्या मतांची प्रतारणा केली. त्यांनी स्वार्थासाठी वेगळ्या विचाराचा आघाडीसोबत साठगाठ बांधत आपलं हिंदुत्व संपवल्याची टीका राज ठाकरेंनी केली.

Raj Thackeray: मविआत गेले आणि हिंदूहृदयसम्राट गायब झाले; उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचे फटकारे
Raj Thackeray First Rally : पहाटेचा शपथविधी अन् पंधरा मिनिटात लग्न तुटलं; राज ठाकरेंची पहिलीच तोफ डोंबिवलीतून धडाडली

२०१९मध्ये भाजपसोबत युती करत त्यांनी निवडणुका लढवल्या. परंतु मुख्यमंत्रिपद मिळत नाही म्हणून त्यांनी युती तोडली आणि आघाडीसोबत गाठ बांधली. भाजप अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देत नसल्याने युती तोडत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. अमित शहा यांनी बंद खोलत अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देणार असल्याचा शब्द दिला होता असा दावा उद्धव ठाकरे करतात. परंतु प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अशी घोषणा केली होती. तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी काहीच हरकत घेतली नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.

२०१९ चा निकाल लागत नाही तोपर्यंत शिवसेनेकडून काही बोलण्यात आलं नाही मात्र निकाल लागताच आघाडीसोबत उद्धव ठाकरे गेल्याचं राज ठाकरे म्हणाले.

हिंदुत्व संपवलं

वेगळ्या विचारांची युती आणि वेगळ्या विचारांची आघाडी असतानाही उद्धव ठाकरेंनी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आघाडीसोबत जाताच हिंदुत्व गेल्याचं टीका राज ठाकरेंनी या सभेत केली. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याबरोबर सगळ्या फोटोवरून आणि बॅनरवरून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोरील हिंदू हृदयसम्राट हे काढून टाकण्यात आलं. इतकेच नाही तर शिवसेनेच्या कार्यक्रमातील बॅनरवरही बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदू हृदयसम्राट हे लिहिलं जात नव्हतं.

तर काही ठिकाणं ऊर्दू होर्डिंगवरती बाळासाहेबांच्या नावापुढे ज़नाब हे लिहिलं जात होतं. स्वत:च्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी पातळी सोडल्याची टीका राज ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंनी मतांची मतदारांची प्रतारणा केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com