Assembly Election: पुणे जिल्ह्यात ३०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, किती जणांनी घेतली माघार?

Pune Assembly Election: पुणे जिल्ह्यातून ४८२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला होता. आज दुपारपर्यंत १७८जणांनी आपला अर्ज मागे घेतलाय.
Assembly Election: पुणे जिल्ह्यात ३०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, किती जणांनी घेतली माघार?
Pune Assembly Election
Published On

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झालंय. महायुती महाविकास आघाडी समोरासमोर लढत होणार आहे तर काही ठिकाणी बंडखोर रिंगणात आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघात एकूण ३०४ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलीय.

विधानसभा निवडणुकीत नशीब अजामवण्यासाठी पुणे जिल्ह्यातून ४८२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता, आज दुपार ३ वाजेपर्यंत १७८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. जिल्ह्यातील सर्वाधिक २ ४ उमेदवार इंदापूर विधानसभा मतदारसंघात ⁠⁠आहेत. तर सर्वात कमी उमेदवार भोर आणि मावळ विधानसभा मतदारसंघात येथे ६ उमेदवार रिंगणात आहेत.

पुणे शहर आणि जिल्हानिहाय उमेदवार

जुन्नर: ११

आंबेगाव: १०

खेड: १३

शिरूर: ११

दौंड: १४

इंदापूर: २४

बारामती: २३

पुरंदर: १६

भोर: ६

मावळ: ६

चिंचवड: २१

पिंपरी: १५

भोसरी: ११

वडगाव शेरी: १६

शिवाजीनगर: १३

कोथरूड: १२

खडकवासला: १४

पर्वती: १५

हडपसर: १९

कॅन्टोन्मेंट: २०

कसबा: १२

पुणे जिल्ह्यातील एकूण मतदार

पुरुष: ४५ लाख ७९ हजार २१६

महिला: ४२ लाख ७९ हजार ५७०

तृतीयपंथी: ८०५

एकूण मतदार: ८८ लाख ५९ हजार ५९१

सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात: ६ लाख ६३ हजार

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ९ कोटी १ लाख रुपये रोकड जप्त केली आहे

पुणे जिल्ह्यात ४ लाख ६५ हजार लिटर दारू जप्त ज्याची किंमत ३ कोटी ५ लाख रुपये

पुणे जिल्ह्यातील उमेदवारांची नावे

कसबा

आमदार रवींद्र धंगेकर,काँगेस

हेमंत रासने,भाजप

गणेश भोकरे,मनसे

कमल व्यवहारे,काँग्रेस बंडखोर

छत्रपती शिवाजीनगर

आमदार सिद्धार्थ शिरोळे,भाजप

दत्ता बहिरट, काँग्रेस

काँग्रेस बंडखोर मनीषा आनंद अपक्ष निवडणूक लढवणार

कोथरूड

आमदार चंद्रकांतदादा पाटील,भाजप

चंद्रकांत मोकाटे,उबाठा शिवसेना

किशोर शिंदे,मनसे

खडकवासला

आमदार भीमराव तापकीर, भाजप

सचिन दोडके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

मयुरेश वांजळे,मनसे

हडपसर

आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

साईनाथ बाबर, मनसे

वडगावशेरी

आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

पर्वती

आमदार माधुरी मिसाळ,भाजप

अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

आबा बागुल, काँग्रेस बंडखोर अपक्ष निवडणूक लढवणार

सचिन तावरे,बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

कॅन्टोन्मेंट

आमदार सुनील कांबळे,भाजप

रमेश बागवे,काँग्रेस

इंदापूर

हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रवीण माने अपक्ष बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

बारामती

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

युगेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

अभिजीत बिचुकले,अपक्ष

पुरंदर

संजय जगताप काँग्रेस

विजय शिवतारे शिवसेना

संभाजीराव झेंडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

भोर वेल्हा मुळशी

संग्राम थोपटे,काँग्रेस

शंकर मांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

किरण दगडे पाटील बंडखोर भाजप

कुलदीप कोंडे शिवसेना बंडखोर

मावळ

सुनील शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब भेगडे,अपक्ष

खेड आळंदी

दिलीप मोहिते पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बाबाजी काळे,शिवसेना उबाठा

आंबेगाव

दिलीप वसे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

देवदत्त निकम,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

जुन्नर

अतुल बेनके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सत्यशील शेरकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार

आशा बुचके,अपक्ष,भाजप बंडखोर

शरद सोनवणे,अपक्ष,शिवसेना

शिरूर हवेली

अशोक पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

माऊली कटके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

दौंड

राहुल कुल,भाजप

रमेशआप्पा थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

पिंपरी

अण्णा बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सुलक्षणा शीलवंत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

चिंचवड

शंकर जगताप,भाजप

राहुल कलाटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

भोसरी

महेश लांडगे,भाजप

अजित गव्हाणे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com