Raj Thackeray First Rally : पहाटेचा शपथविधी अन् पंधरा मिनिटात लग्न तुटलं; राज ठाकरेंची पहिलीच तोफ डोंबिवलीतून धडाडली

Raj Thackeray First Speech : राज ठाकरे यांनी पहिल्या जाहीर सभेत राज्यातील राजकारणावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपधविधीवरून टीका केली.
Raj Thackeray First Rally : पहाटेचा शपथविधी अन् पंधरा मिनिटात लग्न तुटलं; राज ठाकरेंची पहिलीच तोफ डोंबिवलीतून धडाडली
Published On

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. राज ठाकरेंनी डोंबिवलीमधील जाहीर सभेत महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी राज ठाकरेंनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंनी टीका केली.

डोंबिवलीतील जाहीर सभेत राज ठाकरे म्हणाले, 'आमचा राजू विधानसभेत एकटा होता. आमचा आमदार टिकणारा होता, विकणारा होता. अशा गोष्टी आमच्या सहकाऱ्यांना शिवत नाही. शिवसेना आणि भाजपसमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती. २०१९ साली निवडणूक झाली. त्यानंतर एक सकाळचा शपथविधी झाला. ते लग्न पंधरा मिनिटात लग्न तुटलं. त्यावेळी काकांनी डोळे वटारले. त्यानंतर घरी आले. काका मला माफ करा, असे म्हणत घरी आले'.

Raj Thackeray First Rally : पहाटेचा शपथविधी अन् पंधरा मिनिटात लग्न तुटलं; राज ठाकरेंची पहिलीच तोफ डोंबिवलीतून धडाडली
Raju Patil : मनसे आमदार करणार महाविकास आघाडीला मदत; राजू पाटलांच्या वक्तव्याने खळबळ, VIDEO

'त्यांनतंर ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले. त्यांनी सांगितलं की, अमित शहांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची हमी दिली. चार भिंतीत ही चर्चा झाली. उद्धव ठाकरेंच्या समोर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की, पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. अमित शहा देखील फडणवीस मुख्यमंत्री होईल असे म्हणाले. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी आक्षेप का घेतला नाही? त्यावेळी का सांगितलं नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

Raj Thackeray First Rally : पहाटेचा शपथविधी अन् पंधरा मिनिटात लग्न तुटलं; राज ठाकरेंची पहिलीच तोफ डोंबिवलीतून धडाडली
Devendra Fadnavis : देवाभाऊ नाव कसं पडलं? देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च केला नावाचा उलगडा

'निकाल लागेपर्यंत कोणी काहीच बोललं नाही. त्यानंतर त्यांनी पिडायला सुरुवात केली. वेगळ्या विचारांची युती आणि वेगळ्या विचारांची आघाडी. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यावर बॅनरवरील हिंदूहृदयसम्राट हा शब्द गायब झाला. काही उर्दू भाषेत होर्डिंग पाहिले आहेत. काही 'जनाब बाळासाहेब ठाकरे' नावाचे होर्डिंग पाहिले आहेत. यासाठी खालपर्यंत गेलात, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

'विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होतं. त्यावेळी कोण कुठल्या पक्षात होतं, हे कळत नव्हतं. मी तेव्हा सभापतींना सांगितलं की, बाळासाहेबांचं एक तैलचित्र विधानभवनात आणि एक विधानपरिषदेत लावा. तेव्हा अनेक आमदारांना कळेल की, आपण येथे कोणामुळे आलो आहोत, असे ते पुढे म्हणाले.

Raj Thackeray First Rally : पहाटेचा शपथविधी अन् पंधरा मिनिटात लग्न तुटलं; राज ठाकरेंची पहिलीच तोफ डोंबिवलीतून धडाडली
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पुणे शहरातील नाराज नेत्यांच्या भेटीला; बंद दाराआड चर्चा

'आता विचार नावाची गोष्टच विचारली नाही. हे लोक काँग्रेसबरोबर गेले. त्यानंतर यांचे चाळीस आमदार गेले. निसर्ग पाहायला गेले होते. मुख्यमंत्र्यांना त्याचा पत्ता नव्हता. हे चाळीस आमदार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे म्हणाले होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर बसणे. त्यातल्या त्यात अजित पवारांसोबत असताना श्वास घेता येत नव्हता. पुढे शिंदे भाजपबरोबर गेले. त्यानंतर मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांच्यासोबत अजित पवार सोबत आले. हे कोणतं राजकारण सुरु आहे? हे महाराष्ट्राचं भवितव्य आहे का? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com