Maharashtra Election: विदर्भावरून मविआत तणाव? मविच्या बैठकीत खडाजंगी?

Maharashtra Election: महाविकास आघाडीत विदर्भातील जागा वाटपावरून वाद विकोपाला गेलाय. काँग्रेसने विदर्भातील 12 जागा मागितल्या आहेत. या 12 जागा कोणत्या आहेत? त्याबरोबरच राऊतांनी नेमकं काय म्हटलंय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Maharashtra Election: विदर्भावरून मविआत तणाव? मविच्या बैठकीत खडाजंगी?
Business Today
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडीत विदर्भातील 12 जागांवरून वाद विकोपाला गेलाय.. त्यातच संजय राऊतांनी महाविकास आघाडीची तब्बेत बरी असली तरी एक्स रे, एमआरआय करावा लागण्याचं सूचक वक्तव्य केल्याने संदिग्धता आणखीच वाढलीय. तर राऊतांच्या भुमिकेवर रोहित पवारांनी सारवा-सारव करण्याचा प्रयत्न केलाय.

Maharashtra Election: विदर्भावरून मविआत तणाव? मविच्या बैठकीत खडाजंगी?
Bjp Candidate List: भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीतील 'या' गोष्टींनी वेधलं लक्ष, जाणून घ्या ५ मोठ्या गोष्टी

संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा एक्स रे आणि एमआरआय करायची गरज असल्याचं वक्तव्य केल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून हाणामारी होण्याची शक्यता बावनकुळेंनी व्यक्त केलीय.विदर्भातील कोणत्या जागांवरून महाविकास आघाडीतील वाद पेटलाय? पाहूयात.

Maharashtra Election: विदर्भावरून मविआत तणाव? मविच्या बैठकीत खडाजंगी?
Manoj Jarange Patil: महायुती, मविआचा कार्यक्रम करायचाय; मनोज जरांगेंनी विधानसभेसाठी दोन्ही आघाड्याविरोधात थोपटले दंड

विदर्भातील 12 जागांवर मविआत वाद?

1. आरमोरी

2. गडचिरोली

3. गोंदिया

4. भंडारा

5. चिमूर

6. बल्लारपूर

7. चंद्रपूर

8. रामटेक

9. कामठी

10. दक्षिण नागपूर

11. अहेरी

12. भद्रावती वरोरा

मविआत काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याने तोडगा काढण्यासाठी पवार पुढे सरसावलेत. तर आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही पवारांची भेट घेतलीय. त्यामुळे शरद पवारांना या वादात तोडगा काढण्यात यश मिळणार का? यावर मविआच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com