महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवाजी पार्कात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रम वादात सापडलाय. राज ठाकरेंनी केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी केलाय. यावर्षी दीपोत्सव साजरा करत असताना आचारसंहिता लागलीय.दिपोत्सवात मनसे पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार होत असल्याचा आरोप सावंत यांनी केलाय.
दिवाळीच्या काळात साजरा केला जाणारा दीपोत्सवामुळे शिवसेना आणि मनसे आमने-सामने आलेत. दीपोत्सव कार्यक्रमामुळे निवडणूक आदर्श आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. विशेष म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे यांच्याकडूनच ही आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप महेश सावंत यांनी केलाय. दिपोत्सवात मनसे पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रचार होतोय.
तसेच याबाबत निवडणूक आयोगाने कारवाई करावी. दीपोत्सवाचा खर्च मनसेच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा, अशी मागणीही शिवसेनेच्यावतीने करण्यात आलीय. शिवाजी पार्क परिसरात तीनशे चारशे कंदील आपल्याला पाहयाला मिळतील. यावर मनसेचे चिन्ह आहे त्याशिवाय काही ठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत. ते नियमबाह्य आहे त्याला आमचा आक्षेप असल्याचं सावंत यांनी सांगितलंय. शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी याबाबत निवडणूक आयोगाला तक्रारी पत्रही दिले आहे.
दम्यान महेश सावंत म्हणाले, तुम्ही सगळे माध्यमाने सुद्धा अमित ठाकरे तिथे उपस्थित असल्याचे दाखवलं. याचा अर्थ त्या ठिकाणी पूर्णपणे प्रचार या दीपोत्सवाच्या माध्यमातून होत आहे हे दिसतंय. त्यामुळे त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये या दीपोत्सवाचा खर्च अंतर्भूत करावा, ही आमची मागणी आहे.
दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सचिव अनिल देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना यांच्याकडे तक्रार दिलीय. छत्रपती शिवाजी पार्क,दादर येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगीबाबत देखील तक्रार केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.