Assembly Election: संभाजीनगरमधील रामनगरच्या गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार, एकानेही केलं नाही मतदान, कारण काय?

Chhatrapati Sambhaji Nagar: अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे काही मतदान केंद्रावर भरपूर मतदान होत आहे तर, दुसरीकडे काही मतदार केंद्रावर एकही मतदान झाले नाही.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election 2024yandex
Published On

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतदान पार पडते आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.अशा परिस्थितीत अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत.

एकीकडे काही मतदान केंद्रावर ही परिस्थिती असताना, दुसरीकडे काही मतदार केंद्रावर एकही मतदान झाले नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या रामनगर येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. नेमकं या मागचं कारण काय आहे? ते जाणून घेऊयात.

सकाळा ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र एकही ग्रामस्थ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आला नाही. रामनगर हे पुनर्वाचित गावठाण असून 26 वर्ष झाले या गावाला स्मशानभूमी नाही, दफनभूमी नाही, रेकॉर्डला सगळे सुख सुविधा उपलब्ध आहे. नगररचनेप्रमाणे प्लॉट स्मशानभूमी दफनभूमी गावाच्या ताब्यात देण्यात यावी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान गावात पायाभूत सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

Maharashtra Assembly Election
Bhandara: वलमाझरी मतदान केंद्रात वन्यप्राणी संरक्षणाचा संदेश, मतदारांच्या हस्ते वृक्षरोपण

दरम्यान आज राज्यात 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. तर या निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. एकीकडे काही मतदान केंद्रावर भरपूर मतदान होतंय तर, दुसरीकडे काही मतदार केंद्रावर एकही मतदान झालेले नाही.

Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी आज मतदान, महायुती-मविआमध्ये कोण बाजी मारणार?

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com