Maharashtra Election: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत, सुनील टिंगरे की बापू पठारे? वडगाव शेरीत कोण बाजी मारणार?

Pune Vadgaon Sheri Assembly Election: पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बापू पठारे यांचा सामना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि अजित पवार यांचे विश्वासू सुनील टिंगरे यांच्याशी होणार आहे.
Maharashtra Election
Maharashtra ElectionSaam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टिव्ही प्रतिनिधी

अगदी १ महिन्यांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत माजी आमदार बापू पठारे यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर पुण्यातील खराडी भागात त्यांनी महामेळावा घेतला आणि या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थिती लावली. पक्षाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन सुद्धा यावेळी करण्यात आलं. या मेळाव्यात भाषण करताना शरद पवारांनी कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना दिवट्या आमदार म्हणत जोरदार निशाणा साधला. या सभेनंतर वडगाव शेरी बद्दल राजकीय फडावर जोरदार चर्चा सुरू झाल्या.

काही दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या परिसरात विकास कामांच्या हजेरी लावली आणि एक सभा घेतली. यावेळी पक्षाचे आमदार टिंगरे यांच्या कामाचे कौतुक करत अजित पवारांनी त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Assembly Election)

Maharashtra Election
Parner Politics: 'मविआ'ला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही', ठाकरेंच्या शिवसैनिकांचा इशारा, राणी लंकेंच्या उमेदवारीवरुन कलह

कोण आहेत सुनील टिंगरे? (Who Is Sunil Tingre)

सुनील टिंगरे यांचे आजोबा बाळासाहेब टिंगरे हे धानोरी गावचे सरपंच आणि तेव्हापासूनच त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभलेला आहे. सुनील टिंगरे हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी नामांकित व्याव्यसायिकांकडे काम करून स्वतःचा उदरनिर्वाह केला. स्थानिक लोकांशी असलेले संबंध, सामाजिक कार्यात सक्रिय राहणे यामुळेच त्यांनी २००७ मधुर राजकारणात एन्ट्री घेतली आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवला.

२०१२ च्या महापालिकेच्या निवडणुकीत टिंगरे यांचा पत्ता कट झाला. अपक्ष निवडणूक लढवून त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसे मध्ये प्रवेश केला. २०१४ मध्ये मोदी लाटेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला आणि तेव्हा ही त्यांना पराभवाचा फटका बसला. २०१७ मध्ये अजित पवारांचे नेहमीच निष्ठावंत राहिलेले टिंगरे यांनी घरवापसी केली आणि २०१९ मध्ये विधानसभेत विजय मिळवला.

Maharashtra Election
Jogeshwari Politics: जोगेश्वरीमध्ये पुन्हा शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने; मनिषा वायकर विरुद्ध बाळा नर लढत होणार

कोण आहेत बापू पठारे? (Who Is Bapu Pathare)

बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वडगाव शेरी मतदारसंघात यापूर्वी निवडून आले आहेत.
पठारे यांनी नगरसेवक आणि महानगरपालिका स्थायी समितीच अध्यक्षपद भूषवलं आहे. 2009 ला वडगाव शेरी मतदार संघातून ते विजयी झाले होते. त्यानंतर 2014 साली भाजपच्या जगदीश मुळीक यांनी बापू पठारे यांचा पराभव केला. २०१९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र यंदा युती मध्ये ही जागा आपल्याला मिळणार नसल्यामुळे त्यांनी तुतारी हाती घेण्याचे ठरवले. अनुभवी राजकारणी आणि ग्राउंड वर्क ची जाण असलेला म्हणून पठारे यांची ओळख आहे.

काल शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून बापू पठारे तर युती मध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर केली. दुसऱ्या बाजूला मात्र भाजप चे जगदीश मुळीक यांनी आज ही हार मारलेली नाही, या जागेसाठी ते अजूनही ही जागा मलाच मिळेल असा विश्वास व्यक्त करतायत. लोकसभेला याच मतदारसंघातून खासदार मुरलीधर मोहोळ यांना १४ हजार मतांचे मताधिक्य होतं. त्यामुळे विधानसभेला आता महायुती मध्ये असलेले विद्यमान आमदार टिंगरे पुन्हा एकदा बाजी मारणार का बापू पठारे वडगाव मध्ये तुतारी वाजवणार हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.

Maharashtra Election
Maharashtra Politics: संभाजीराजे छत्रपती तडकाफडकी अंतरवाली सराटीकडे रवाना, मनोज जरांगेंची घेणार भेट; नवी रणनीती काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com