Maharashtra Politics: संभाजीराजे छत्रपती तडकाफडकी अंतरवाली सराटीकडे रवाना, मनोज जरांगेंची घेणार भेट; नवी रणनीती काय?

Sambhaji Raje Chhatrapati And Manoj Jarange Patil: स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. पुण्यातून तातडीने विमानाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झालेत.
Maharashtra Politics: संभाजीराजे छत्रपती तडकाफडकी आंतरवाली सराटीकडे रवाना, मनोज जरांगेंची घेणार भेट; नवी रणनीती काय?
Maharashtra Politics Newssaam tv
Published On

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांच्या यादीची घोषणा करत आहेत. काही राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत तिढा आहे. तर काही राजकीय पक्षांमध्ये जागावाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. राज्यातील तिसऱ्या आघाडीने देखील उमेदवारी यादी जाहीर केल्या आहेत.

तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे त्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये मुलाखती सुरू आहेत. अशातच आज जरांगे पाटील यांची स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती भेट घेणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. पुण्यातून तातडीने विमानाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा मतांचे मतविभाजन टाळण्यासाठी नवीन राजकीय समीकरणांवर चर्चा अपेक्षित आहेत. सकाळी १० वाजता अंतरवली सराटी येथे दोघांमध्ये महत्त्वपूर्ण भेट होणार आहे.

मराठा आरक्षण आणि विधानसभेच्या रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दोघांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली. विधानसभा निवडणुकीतील मतविभाजन रोखण्यासाठी नवी रणनीती ठरण्याची शक्यता आहे. २०२४ विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे.

Maharashtra Politics: संभाजीराजे छत्रपती तडकाफडकी आंतरवाली सराटीकडे रवाना, मनोज जरांगेंची घेणार भेट; नवी रणनीती काय?
Manoj Jarange Patil: मला १०० टक्के अटक करणार आहेत...; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा

दरम्यान, उदय सामंत यांनी आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी २० मिनिटं चर्चा झाली. या चर्चेचं नेमकं कारण अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानक उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. दरम्यान याआधी देखील त्यांनी अचानक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत येऊन भेट घेतली होती. या भेटीमागचे कारण देखील अद्याप समजू शकले नाही.

Maharashtra Politics: संभाजीराजे छत्रपती तडकाफडकी आंतरवाली सराटीकडे रवाना, मनोज जरांगेंची घेणार भेट; नवी रणनीती काय?
Sambhaji Raje Chhatrapati : उमेदवार पाडण्यापेक्षा..; निवडणूक जाहीर होताच संभाजीराजेंचा जरांगेंना सल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com