संजय सूर्यवंशी
नांदेड : सततच्या नुकसानीची राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये ओला दुष्काळ झाला. त्यावेळेस आम्ही पाहणी दौरा केला. परंतु शेतकऱ्यांचे जे विषय आहेत, ते अद्याप मार्गी लागले नाहीत. पिक विम्याचा महत्त्वाचा प्रश्न जैसे थे आहे. अद्याप पंचनामे झाले नाहीत आणि शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठमोठ्या घोषणा करायच्या; प्रत्यक्षात मात्र कुठलीच अंमलबजावणी करण्यात आली नाही; असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) हे नांदेडमध्ये आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. नांदेड हे मराठवाड्यातला दोन नंबरचा मोठा जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यात अजूनही सिंचनाची सोय झालेली नाही. या जिल्ह्यातील लेंडी सारखा प्रकल्प अद्यापही अर्धवट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांचे (Farmer) प्रश्न जर सोडवायचे असतील तर ते प्रामाणिकपणे सोडवा.
पॉलिटिकल स्टंट कशाला?
नांदेडमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात मेळावा घेण्यात आला. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महिलांना त्या ठिकाणी बसवण्यात आलं. यातील एका महिलेला अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. असा पॉलिटिकल स्टंट कशाला करायचा? असा सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. आम्ही त्यांचं देखील कौतुक करू. परंतु असे पॉलिटिकल स्टंट करायचे आणि मग म्हणायचं त्या महिलेला अटॅक आला.
परिवर्तन महाशक्ती २८८ जागा लढवणार
आगामी निवडणुकीवर बोलताना त्यांनी 288 जागा आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त जागा लढवण्याचा मानस असल्याचे सांगितले. जर चांगले उमेदवार प्रस्थापित पक्षामधून जर आले, तर त्यांचे देखील आम्ही स्वागत करू. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. त्यामधील नाराज लोक हे कोणासोबत जातील हे सांगता येत नाही. तुम्हाला वेगळे चित्र काही दिवसात परिवर्तन महाशक्तीच्या संदर्भात पाहायला मिळेल. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही एक चांगला पर्याय घेऊन येत आहोत. मागील ७५ वर्षांपासून त्या समस्या कायम आहेत. हेच लोक सत्तेत आहेत. कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलं. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी देखील याच नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व केलं. काँग्रेस पक्षाकडून अशोक चव्हाण यांना सर्व काही दिलं आणि एका रात्रीत अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपात गेले. अशा या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे. महाशक्ती कडे पाहायला लागली आहे.
मराठा आरक्षणासाठी इच्छाशक्ती असावी
आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. शासन म्हणत आहे की दहा टक्के आरक्षण दिले आहे. परंतु हे आरक्षण टिकेल का? हा प्रश्न आहे. हैदराबाद गॅजेट असेल. दहा टक्के आरक्षण दिलेलं हे केल की नाही हे माहीत नाही. फक्त दोन दिवस उरलेले आहेत. याला मार्ग पाहिजे मार्ग जर मिळवायचा असेल तर याला राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. आणि आम्ही जर आलो आणि लोकांनी विश्वास ठेवला तर निश्चितच यातून मार्ग निघेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.