Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारे 5 फॅक्टर; राज ठाकरे आणि जरांगेंचा कुणाला फटका? पाहा व्हिडिओ

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारे 5 फॅक्टर आहेत. या निवडणुकीत राज ठाकरे आणि जरांगेंचा फटका कुणाला बसला, हे पाहुयात.
विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारे 5 फॅक्टर; राज ठाकरे आणि जरांगेंचा कुणाला फटका? पाहा व्हिडिओ
Maharashtra Assembly Election 2024 Saam tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचं बिगूल वाजलंय..त्यातच अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची लगबग सुरु आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याच्या राजकारणात राज ठाकरे ते जरांगे यासह 5 फॅक्टरने सत्ताधारी आणि विरोधकांचं टेंशन वाढलंय. तर सत्ताधाऱ्यांचं टेंशन वाढवणारे 5 फॅक्टर कोणते आहेत? पाहूयात..

जरांगे फॅक्टर आणि मराठा आंदोलन

लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर, नाशिक, सोलापूरसह मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला. मात्र विधानसभेला जरांगे फॅक्टरचा कुणाला फटका बसणार पाहूयात.

उमेदवार दिलेल्या ठिकाणी मतविभाजनाचा मविआला फटका बसण्याची शक्यता

जरांगेंनी उमेदवार न दिलेल्या ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता

विधानसभेला दुसरा महत्वाचा ठरणारा फॅक्टर म्हणजे परिवर्तन महाशक्ती आघाडी फॅक्टर

संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, राजरत्न आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीची स्थापना केलीय. मात्र संभाजीराजे, बच्चू कडू हे सातत्याने महायुतीवर टीका करत असल्याने मविआच्या मतांमध्ये फुट पडून फटका बसण्याची शक्यता

वंचित फॅक्टर

2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपला करिष्मा दाखवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची त्यानंतर सर्वच निवडणुकीत घसरण झालीय.

वंचित फॅक्टरचा करिष्मा?

2019 च्या लोकसभेला 41 लाख 32 हजार मतं

2019 च्या विधानसभेला वंचितच्या मतांमध्ये घसरण

2024 च्या लोकसभेत 15 लाख 66 हजार मतं

वंचितच्या मतांमध्ये घसरण सुरु असली तरी दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसींना सोबत घेण्याची रणनीती प्रकाश आंबेडकरांनी आखलीय. त्यामुळे विदर्भ आणि आदिवासी पट्ट्यात वंचित प्रभाव दाखवू शकते. त्यामुळे मतविभाजनाचा फटका मविआला बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलीय.

विधानसभा निवडणुकीत चौथा मनसे हा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.

राज ठाकरे फॅक्टर

राज ठाकरेंनी अडीचशेपेक्षा जास्त जागा लढवण्याची घोषणा केलीय. त्यातच राज ठाकरेंनी मुंबईसह, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशावर लक्ष केंद्रीत केलंय.. मात्र हा फॅक्टर कुणासाठी अडचणीचा ठरणार? पाहूयात.

राज ठाकरे मुंबईतील 32 जागांवर प्रभाव पाडू शकतात

मुंबईत मनसे फॅक्टरचा फटका ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता

मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटालाही फटका बसण्याची शक्यता

राज्याच्या निकालावर प्रभाव टाकणारा 5 वा फॅक्टर म्हणजे MIM

एमआयएम फॅक्टर

लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा मुस्लीम मतं हे महाविकास आघाडीकडे झुकले होते. मात्र आता विधानसभेला मुस्लीम आरक्षण, वक्फ बोर्ड आणि मुस्लीम प्रतिनिधीत्वाचा मुद्दा एमआयएमने उपस्थित केलाय. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या मुद्द्यावर ही मतं आपल्याकडे खेचण्यासाठी MIM प्रयत्नशील आहे. त्यामुळे एमआयएमचा फटका मविआला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हरियाणाप्रमाणेच महायुतीकडून महाराष्ट्रात मायक्रो ओबीसींना सोबत घेण्याची रणनीती आखली जातेय. मात्र जरांगे ते वंचित हे फॅक्टर विधानसभेला चमत्कार करणार का? यावर सत्तेची गणितं अवलंबून असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com