संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी
जोगेश्वरीतून महायुतीकडून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे बाळा नर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जोगेश्वरीतील विधानसभेची ही लढाई दोन शिवसैनिकांमध्ये होणार आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघासाठी बाळा नर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले आहे. जोगेश्वरीतील लढाई ही दोन शिवसैनिकांमधील असून एकीकडे निष्ठावंत शिवसैनिक आणि दुसरीकडे वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेनेतून गेलेल्या शिवसैनिक अशी ही लढाई होणार आहे असे म्हणत बाळा नर यांनी रवींद्र वायकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. जोगेश्वरी झालेली कामे कोणत्या ब्रँड ने नाही तर सरकारच्या पैशातून झालेली आहेत मात्र जोगेश्वरी साठ सालापासून बसण्यास सुरुवात झाली तेव्हापासून च्या समस्या आज देखील आहेत असे म्हणत रवींद्र वायकर यांच्या कामगिरीवर देखील टीकास्त्र सोडले आहे. (Maharashtra Assembly Election)
जोगेश्वरी पूर्व (Jogeshwari East) विधानसभेच्या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहेत जोगेश्वरी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्याच विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक बाळा नर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर मनसे कडून देखील या ठिकाणी उमेदवार उतरवण्यात आला असून मनसेने भास्कर अंभोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे जोगेश्वरी विधानसभेत यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे महत्त्वाचे म्हणजे खासदार रवींद्र वायकर आणि माजी नगरसेवक बाळांना यांच्यातील नाते हे गुरु शिष्याचे आहे वायकर नगरसेवक असताना बाळा नर हे शाखाप्रमुख होते तेव्हापासूनच वायकर यांचा सोबत राहून बाळा नर यांनी राजकारणाचे धडे गिरविले मात्र आता जोगेश्वरीतील ही लढत गुरु शिष्य यांच्या त होणार आहे यात बाजी कोण मारेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी नगरसेवक बाळा नर यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जोगेश्वरी मध्ये अध्यापक बरीच विकास करणे बाकी असल्याचे म्हटले आहे जोगेश्वरी 1960 सालापासून बसण्यास सुरुवात झाली तेव्हाच्या समस्या होत्या ज्या अडचणी होत्या त्या आजही प्रशास आहेत त्यामुळे या ठिकाणी कोणी विकास कामांचा दावा करत असेल स्वतःला ब्रँड म्हणत असेल तर तो ब्रँड नाही इथे शिवसेना ठाकरे ब्रँड आहेत या ठिकाणी झालेली विकास कामे ही शासनाने दिलेल्या निधीतून झाली आहे मात्र आजही जोगेश्वरी करांच्या अनेक समस्या आहेत त्या सर्व समस्या येत्या काळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे नर यांनी म्हटले आहे.
वायकर आणि नर हे दोघेही पूर्वी अखंड शिवसेनेत एकत्र काम करत होते मात्र शिवसेना फुटी नंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आणि यामुळे आता जोगेश्वरीतील विधानसभेचा हा सामना दोन शिवसैनिकांमध्ये राहणारा आहे या संदर्भात नर यांना विचारले असता ही लढत जरी दोन शिवसैनिकांमध्ये होणार असेल हे खरं आहे मात्र एकीकडे निष्ठावंत शिवसैनिक आणि दुसरीकडे वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेनेला सोडून गेलेला शिवसैनिक अशी ही लढाई होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दगडाला शेंदूर फासून उच्च स्थानी पोचविण्याचे किमया करून दाखवली आहे मात्र आता यातील काही लोक हे त्याचे शिवसेनेला संपविण्याचे स्वप्न पाहत आहेत मात्र जोगेश्वरीतील सामान्य जनता यावेळी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मागील लोकसभा निवडणुकीत देखील जोगेश्वरी करांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे असे देखील बाळा नर यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.