Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

Jogeshwari East Assembly seat : शिंदे गटाच्या जागेवर भाजपने दावा केल्याने शिवेसना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यातच या दावेदारीच्या खेळात नवा ट्विस्ट आलाय.
Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच  रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी
Jogeshwari East Assembly sea
Published On

संजय गडदे, साम प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. सर्वच पक्षांकडून मतदारसंघाचा आढावा घेण्यासोबतच उमेदवारांची चाचणी देखील सुरू आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वे विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आता भाजपकडून देखील या जागेवर दावा केला जात आहे. संपूर्ण जोगेश्वरी परिसरात जोगेश्वरीच्या जनतेचा निर्धार यावेळी भाजपचा आमदार असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आले आहे.

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच  रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी
Maharashtra Politics: दादांच्या एक्झिटसाठी भाजप-सेनेचा प्लॅन? विधानसभेत अजित पवारांना एकटं लढावं लागणार? वाचा...

दोन दिवसापूर्वी माजी नगरसेविका उज्वला मोडक यांनी आपल्या समर्थकांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी निवेदन दिले मात्र आज जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर यांच्या समर्थकांनी एकत्रित येऊन संतोष मेढेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी घोषणाबाजी केली. यामुळे अगोदर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जागेवरून सुरू असलेली रस्सीखेच अद्यापही थांबली नसतानाच आता जोगेश्वरी पूर्व च्या जागेवरून माजी नगरसेविका उज्वला मोडक आणि जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर यांच्यात रस्सीखेच सुरू झाल्याने जोगेश्वरी भाजपात सर्व अलबेल आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच  रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी
Vidhan Sabha Election : मंत्रिपद मिळाले नाही तर बायको आत्महत्या करेल, मुख्यमंत्री शिंदेंना कुणी केलं ब्लॅकमेल?

जोगेश्वरी पूर्व विधानसभेत महायुतीकडून आत्तापर्यंत रवींद्र वायकर हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी पूर्वी रवींद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीत ते विजयी झाल्यामुळे सध्या जोगेश्वरी पूर्व विधानसभेत कोणीही आमदार नाही.

मात्र मागील अनेक वर्ष आम्ही महायुतीचा धर्म म्हणून शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांचे काम एकनिष्ठेने केले आहे आता ते खासदार म्हणून दिल्लीत दिले आहेत त्यामुळे त्यांनी मोठे मन करून जोगेश्वरी पूर्व विधानसभेची जागा भाजपसाठी सोडवावी असा मतप्रवाह भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे. यासाठी जोगेश्वरी विधानसभेत भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तसा ठराव मांडून भाजपच्या एका गटाने दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या.

शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून रस्त्याचे सुरू असतानाच आता भाजपात देखील जागा भाजपासाठी सुटल्यास उमेदवारी आपल्याला मिळावी किंवा आपल्या नेत्याला मिळावी यासाठी कार्यकर्त्यांमध्ये देखील आता रस्सीखेच सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा अध्यक्ष संतोष मेढेकर यांच्या समर्थनार्थ जोगेश्वरीतील शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत मेढेकरांसाठी विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी देखील केली आहे.

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्या विधानसभा अध्यक्ष मंदा माने यांनीह म्हटले की, आजपर्यंत आम्ही अनेक वर्ष महायुतीमधून शिवसेनेचे काम केले रवींद्र वायकर यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्यापासून अगदी खासदार म्हणून निवडून आणण्यापर्यंत मेहनत घेतली. आता त्यांनी मोठे मन करून जोगेश्वरी पूर्व विधानसभेची जागा ही भाजपाला सोडावी, असे मत माने यांनी व्यक्त केले आहे. शिवाय यापूर्वी भाजपकडून उज्वला मोडक यांनादेखील आमदारकीची संधी मिळाली होती मात्र आता सर्वांनासोबत घेऊन जाणाऱ्या जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी माने यांनी केली आहे.

जोगेश्वरी पूर्व विधानसभेत एकूण आठ नगरसेवक आहेत यापैकी तीन नगरसेवक हे भाजपाचे आहेत तर दोन जागेवर भाजपच्या उमेदवारांचा काहीशा मतांनी पराभव झालेला आहे. मतदारसंघातील २८५ बुथवर भाजपचे बूथ प्रमुख आहेत. जेवढे शक्ती केंद्र आहेत तेवढे शक्ती केंद्रप्रमुख आहेत. प्रत्येक बुथ मधील ३० - ३० कार्यकर्ते हे त्या बूथप्रमुखाशी समन्वय करत आहेत. आता इथे शिवसेनेत दोन गट पडले आहेत येथील बहुसंख्य उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार फक्त आणि फक्त भाजपसोबत आहे.

२०१४ च्या निवडणुकीत उज्वला मराठी यांनी अवघ्या १२ दिवसात मिळत करून ४४ हजार मतदान घेतले तेव्हा तर आमचं संघटनही फारसं प्रबळ नव्हतं एक नगरसेवक होता आता आमचे तीन नगरसेवक आहेत, आमची मतदारसंघात ताकद वाढली आहे, त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाने भाजपासाठी सोडावा असे रमण झा यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com