Kalyan Lok Sabha : कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविरुद्ध अपक्ष लढाई; नेत्यानं श्रीकांत शिंदेंचं नावही घेतलं नाही!

Kalyan News : कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्याकडून प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत बोलताना वरूण सरदेसाई यांनी श्रीकांत शिंदे यांना चिमटा काढला
Kalyan Lok Sabha
Kalyan Lok SabhaSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: कल्याण लोकसभेसाठी शिंदे गटाकडून अद्याप उमेदवार घोषित झालेला नाही. त्यामुळे आजघडीला (Shiv Sena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरुद्ध अपक्ष अशी लोकसभेतील लढाई आहे. तसेच जनता आमच्या पाठीमागे आहे. मशाल चिन्ह घरोघरी पोहोचले पाहिजे. याकरता संपूर्ण महाराष्ट्रात प्रयत्न करत असल्याचे मत ठाकरे गटाचे वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी व्यक्त केले. 

Kalyan Lok Sabha
Sangli Crime News: जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून; वाद झाल्‍याने कुऱ्हाडीने केला वार

कल्याण (Kalyan) लोकसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत बोलताना वरूण सरदेसाई यांनी श्रीकांत शिंदे यांना चिमटा काढला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या प्रती संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड सहानुभूती लोकप्रियतेचे लाट आहेत. त्या लाटेवर आम्ही परत एकदा जिंकू; असा विश्वास देखील सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे. 

Kalyan Lok Sabha
Lok Sabha Election : इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्याना करता आले नाही मतदान; ईडीसी प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याचा आरोप

धनशक्ती विरुद्ध लढाई 

राजकारणाचा स्तर वेगळ्या पातळीला जाऊन पोहोचला आहे. असं असताना (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी सामान्य घरातील महिलेला उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर या कमी वयात नगरसेविका म्हणून निवडून आल्या. कल्याण- डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती मसल पावर अशी ही लढत होणार आहे. त्यामध्ये कल्याण लोकसभेचे जनता हे निष्ठावंत वैशाली दरेकर यांच्या सोबत उभी राहणार असल्याचे सांगितले. आमच्या पक्षात कोणतेही नाराजी नसून नाराजी असेल तर ते दूर करण्यातील असे देखील यावेळी वरूण सरदेसाई यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com