Sangli Crime News
Sangli Crime NewsSaam tv

Sangli Crime News: जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून; वाद झाल्‍याने कुऱ्हाडीने केला वार

जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून; वाद झाल्‍याने कुऱ्हाडीने केला वार
Published on

सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडगमध्ये रात्री जमिनीच्या वादातून सख्या चुलत भावाकडून भावाचा खून (Sangli News) झाल्याची घटना घडली.कुऱ्हाडीने मानेवर वार करुन हा खून करण्यात आला आहे. बंडू शंकर खरात (वय ५०) असे मयताचे नाव आहे. रात्री आठ ते नऊच्या दरम्यान कुऱ्हाडीने हल्ला (Crime News) करून निर्घृण खून करण्यात आला. (Maharasthra News)

Sangli Crime News
Jalna News: जालन्यात बनावट खताचा गोरख धंदा उघड; बनावट खत साठ्यासह रिकाम्या गोण्याच्या साठा जप्त

सांगलीच्‍या बेडगमध्‍ये मल्लेवाडी रस्त्यावर खरात वस्ती येथे घटना घडली. बंडू खरात यांचा चुलत भाऊ सचिन खरात यांच्याशी जमिनीचा वाद सुरू होता. दरम्‍यान सोमवारी रात्री वाद विकोपाला गेला. त्याचे पर्यवसान खुनामध्ये झाले. वादात खरात यांच्या मानेवर, तोंडावर, पाठीवर घाव घालण्यात आले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Sangli Crime News
Jalgaon Accident News: पोलिसाने हात दाखवला अन्‌ झाला घात; ट्रक जागीच थांबल्‍याने ट्रकवर आदळून दुचाकीस्वार ठार

आरोपी अटकेत

मिरज ग्रामीण (Police) पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. खुनानंतर आरोपी सचिन बबन खरात (वय ३०) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या खुनात वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com