Maharashtra Assembly Election: सध्या राज्यात काल २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. शहादा मतदारसंघातून भाजपाचं पारडं जड दिसतंय. २०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणूकांमध्ये भाजपानेच हा गड राखलेला आहे आणि आता तिसरी टर्म आहे याठिकाणी भाजपाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी राजेश पाडवी यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे.
शहादा मतदारसंघामध्ये भाजपाकडून राजेश पाडवी निवडणूक लढत आहेत. तर काँग्रेसकडून राजेंद्रकुमाप गावीत हे निवडणुकीच्या रिंगणात होते. राजेंद्रकुमार गावीत यांचं आवाहन संपुष्टात येऊ शकतं.या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, राजेश पाडवी हे संभाव्य आमदार असू शकतात. तर राजेंद्रकुमार गावीत यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.
राजेश पाडवी हे संभाव्य आमदार म्हणून यांना शहादातले नागरिक जे आहेत त्यांनी पसंती दिल्याचं दिसतंय. काँग्रेसचा हा शहादा पूर्वीचा जो गड होता तो भाजपा कायम राखेल असं सध्या तरी दिसतंय. काँग्रेसचा पारंपरिक मतदार हा रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने काँग्रेसला दगाफटका बसू शकतो असाही कयास लावला जात आहे.
परंतू शहरी भागात भाजपाला भरभरुन मतदान झाल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. असे असले तरी अवघ्या चार महिन्यापूर्वी ४०,००० मतांचा लीड काँग्रेसला भेटल्याने काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे काही कार्यकर्ते बोलत आहेत. (Shahada Constituency)