सध्या राज्यात काल २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. ठाणे मतदारसंघातून भाजपाचं पारडं जड असल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे येथे संजय केळकर यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे मतदारसंघामध्ये भाजपाकडून(BJP) संजय केळकर हे निवडणूक लढत आहेत. तर ठाकरे गटाकडून राजन विचारे हे निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, संजय केळकर हे संभाव्य आमदार असू शकतात. राजन विचारे यांचा याठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे.
राजन विचारे माजी खासदार लोकसभेला पराभव झाले आहेत आणि आतादेखील विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतात असं दिसतंय. याच ठाणे मतदारसंघातून मनसेकडून अविनाश जाधव यांचं देखील तगडं आव्हान या संजय केळकरांच्या पुढे होतं.
परंतू, आता संजय केळकर या दोघांनाही मात करत संभाव्य आमदार होऊ शकतात. ठाणेकरांची पसंती संभाव्य आमदार म्हणून संजय केळकरांना मिळेल असं दिसतंय.