महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी काल, २० नोव्हेंबरला मतदान झालं. त्यानंंतर सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. रावेर मतदारसंघात काँग्रेसचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे या ठिकाणी धनंजय चौधरी यांना जास्तीत जास्त मते मिळण्याची शक्यता आहे. धनंजय चौधरी याठिकाणी निवडून येऊ शकतात. आमदार म्हणून मतदार त्यांना कौल देताना दिसतायेत.
रावेर मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून धनंजय चौधरी निवडणूक लढत आहेत. तर भाजपाकडून अमोल जावळे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, धनंजय चौधरी हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर अमोल जावळे यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी जावळे यांच्याकडून तगडं आव्हान दिलं गेलं होतं. मात्र यावेळी काँग्रेस त्यांचा गड राखताना दिसत आहेत.
रावेर विधानसभा मतदारसंघात यावेळी अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने धनंजय चौधरी तर महायुती आणि भारतीय जनता पक्षाच्या अमोल जावळे यांच्यात ही लढत झाली. आजी-माजी आमदारांमध्ये झालेली ही लढत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झाली आहे. आमदार शिरीश चौधरी यांचे सूपुत्र असलेले धनंजय चौधरी यांनी गेल्या ३-४ वर्षांपासून मतदारसंघातला आपला संपर्क वाढवला होता. प्रकृती अस्वस्थ असल्याने शिरीष चौधरी यांनी ही निवडणूक लढवायला नकार दिल्याने काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती.
अमोल जावळे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आपला संपर्क या मतदारसंघात वाढवला होता. भारतीय जनता पक्षाचं संघटनही या मतदारसंघात आता वाढत चालला आहे. मात्र आमदार शिरीश चौधरी यांचा या निवडणुकांचा असलेला अनुभव त्यांनी केलेली कामे त्यांच्या कुटुंबाचं गेल्या ३ पिढ्यांपासून या मतदारसंघात असलेला विकासाचा वारसा धनंजय चौधरी यांच्यामागे असलेलं युवक संघटन आणि त्यांचे एकूणच विनम्र, उत्साही असं व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टींचा विचार करुन त्यांना विजय मिळेल अशी शक्यता मतदार व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.