मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी वयोमान आणि आजारपणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान करताना अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो. यंदा भारतीय निवडणूक आयोगाकडून ८५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी विशेष उपलब्ध असणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना वयोमान आणि आजारपणामुळे मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवता येत नाही. त्यामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागतं. यामुळे निवडणूक आयोगाने ८० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबवला आहे.
महाराष्ट्रातील मतदान केंद्राच्या तळमजल्यावर किंवा गेटजवळ व्हीलचेअरची सुविधा ही ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मतदान केंद्रावर अशी सोय केली जाणार आहे. यासाठी पीडब्लूडी आणि स्वयंसेवकांद्वारे मदत केली जाणार आहे.
दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाच्या दिवशी सुविधा
विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक (८५ वर्ष व त्यापेक्षा अधिक) मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याकरिता सक्षम ॲपवर नोंदणी केलेल्या मतदारांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या ॲपवर नोंदणीकृत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना गरजेनुसार वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सक्षम मोबाईल ॲपवर नोंदणी न करू शकलेल्या काही दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची समस्या सोडवण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. मोफत बस सुविधेकरिता बेस्टकडून मतदान केंद्राच्या लोकेशननुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आलाय. त्याचबरोबर समन्वय अधिकारी आणि रूट प्लान एका क्लिकवर मतदारांना मिळण्यासाठी क्युआर कोड तयार करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.