Voting Center: मतदान केंद्रावर कोण कोणत्या सोयी सुविधा, आयोगानं कोणती तयारी केली?

Voting Center Services: उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उद्या मतदान केंद्रावर काही सुविधा मतदारांसाठी उपलब्ध केले जाणार आहे.
Voting Center
Voting CenterSaamTv
Published On

उद्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Voting Center
Voting Ink: मतदानाला वापरली जाणारी शाई कुठून येते? कशापासून बनवली जाते? जाणून घ्या A to Z माहिती

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना रॅम्प या सुविधा पुरवण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर कोणत्या सुविधा असणार आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती व्हावी, यासाठी बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिठ्ठीचे वाटप केले जात आहे. तसेच मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे.

Voting Center
Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं? वोटर आयडी नसल्यास काय करावे? हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

मतदान केंद्रावर कोणतीही अडचण येणार नाही यासाठी केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, टोकन सिस्टीम याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदान केंद्रावर सुविधा

मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांग व्यक्तींसाठी व्हिलचेअर, रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रांगेमध्ये उभे असलेल्या मतदारांना बसण्यासाठी खुर्ची आणि बाकडे असणार आहे. जर मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असेल तर मंडराची उभारणी, पंखे असतील. तसेच केंद्रावर ठळक अक्षरात मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे

Voter Helpline Number

मतदारांना मतदार यादी नाव आहे की नाही हे अॅपद्वारे तपासता येणार आहे. C Vigil या अॅपच्या मदतीने तुम्ही आचारसंहिता उल्लंघन केल्यावर तक्रार करते येते. यानंतर १०० मिनिटांत कारवाईची माहिती तुमच्यापर्यंत पोहचते.

Voting Center
Maharashtra Election: नाद करा पण आमचा कुठं? शरद पवारांच्या इशाऱ्याला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com