Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Voter ID: येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी जाताना तुम्हाला वोटर आयडी घेऊन जायचे आहे. वोटर आयडी नसल्यासदेखील तुम्ही मतदान करु शकतात.
Voter ID Rules
Voter ID RulesSaam Tv
Published On

राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मतदान करणे ह प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे.मतदान करण्यासाठी प्रत्येक नागरिकाकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. परंतु आता तुम्ही मतदान ओळखपत्राशिवायदेखील मतदान करु शकतात. तुम्ही मतदार ओळखपत्र नसल्याने इतर १२ प्रकारचे पुरावे देऊन मतदान करु शकतात.

या १२ पुराव्यांच्या आधारे तुम्ही मतदान करु शकतात. या १२ पुराव्यांपैकी एक पुरावा दाखवल्यानंतर तुम्ही मतदान करु शकतात, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. तसेच मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Voter ID Rules)

Voter ID Rules
Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

मतदार ओळखपत्र सादर न करु शकणाऱ्या मतदारांनी ओळख पटवण्यासाठी पुढील पुरावे सादर करावेत.

१. ओळखपत्र (जॉब कार्ड)

२.बँक किंवा टपाल कार्ड

३. मनरेगाअंतर्गत रोजगार ओळखपत्र

४.श्रम मंत्रालयाअंतर्गत दिलेले विमा स्मार्ट कार्ड

५.वाहन चालक परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स)

६. स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड)

७. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय)

८. पासपोर्ट

९. निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे

१०. सेवा ओळखपत्र

११. संसद,विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना दिलेले ओळखपत्र

१२. दिव्यांग व्यक्तींना दिलेले विशेष ओळखपत्र

Voter ID Rules
Voter List: मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? या सोप्या पद्धतीने तपासा

जर मतदारांनी हे १२ पुरावे दाखवले तर त्यांना मतदान करता येणार आहे.त्यामुळे मतदान केंद्रावर जाताना या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र घेऊन जावे,त्यानंतरच तुम्हाला मतदान करता येणार आहे.

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

मतदान केंद्रात मतदारांना मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानाचे चित्रीकरण, फोटो काढून गोपनीयता भंग करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे.

Voter ID Rules
Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com