महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. विधानसभेसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणुक आयोगाने केले आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने मतदान करावे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोण निवडून येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या घोषणा केल्या जात आहे. मतदान करण्यापूर्वी मतदार यादी जाहीर केली जाते. या यादीत नाव असल्यावर तुम्ही मतदान करु शकतात.तर तुमचे मतदार यादीत नाव आहे की नाही ते कसं चेक करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
निवडणुकीपूर्वी मतदार यादी जाहीर होते.यात काी मतदारांची नावे नव्याने येतात. तर अनेकदा मतदार यादीत नाव नसल्याने अडची येतात. त्यामुळेच तुमचे मतदार यादीत नाव आहे की नाही ते चेक करा. तुम्ही घरबसल्या २ सोप्या मार्गांनी मतदार यादीत नाव आहे की नाही ते चेक करु शकतात.
मतदार यादीत नाव आहे की नाही असं चेक करा. (How To Check Name In Voter List)
सर्वप्रथम तुम्हाला भारतीय निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तुम्ही https://electroalsearch.eci.gov.in/ या वेबसाइटवर जा.
वेबसाइटच्या वरच्या बाजूला serach by details, serach by epic, search by mobile असे दिसेल. यापैकी एकावर क्लिक करा.
यानंतर आवश्यक माहिती भरा. कॅप्चा कोड टाका आणि सर्च वर क्लिक करा.
यानंतर मतदार यादीतील तुमचं नावं,epic नंबर अशी सर्व माहिती दिसेल.
यानंतर सर्च केल्यानंतर तुमचं नाव दिसत नसेल तर राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.
SMS द्वारे शोधा मतदार यादीतील तुमचं नाव
SMS पाठवून तुम्ही मतदार यादीतील नाव चेक करु शकतात.
तुम्ही तुमचा मतदार ओळख क्रमांक टाईप करा.हा एसएमएस 9211728082 किंवा 1920 वर पाठवा. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे माहिती मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.