Voting Ink: मतदानाला वापरली जाणारी शाई कुठून येते? कशापासून बनवली जाते? जाणून घ्या A to Z माहिती

Voting Ink History: राज्यात उद्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर शाई लावली जाते. ही शाई कशापासून बनवली जाते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Voting Ink
Voting InkSaam Tv
Published On

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. उद्या राज्यात मतदान होणार आहे. मतदान करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. मतदान करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान केंद्रावर जायचे आहे. मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर निळ्या शाईने खूण केली जाते. अनेकजण या निळ्या शाईचा फोटो सोशल मीडियावर टाकतात.

बोटावरची शाई ही तुम्ही मतदान केला असल्याचा पुरावा आहे. परंतु ही शाई कुठून येते?शाई लावण्याची प्रथा कधीपासून सुरु झाली? ही निळी शाई कशापासून बनवली जाते?,असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण झाले आहेत. याबाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे.

मतदारांच्या बोटाला लावली जाणारी निळी शाई म्हणजे काय? (What Is Voting ink)

मतदारांच्या हाताला लावली जाणारा निळी शाई ही सिलव्हर नायट्रेट, विविध रंग आणि सॉल्व्हेंट्स यांचे मिश्रण असते. ही शाई निवडणूकीसाठी वापरली जाते. ४० सेकंदाच्या आता बोटांच्या नखावर आणि त्वचेवर शाई लावल्यास छाप सोडते.

Voting Ink
Maharashtra Assembly Elections : लालपरीला लागली इलेक्शन ड्युटी; मतदानाच्या दिवशी असेल बिझी, पण...

शाईची निर्मिती (Voting Ink)

मिडिया रिपोर्टनुसार, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीज नवी दिल्ली येथील केमिस्ट डॉ. नाहर सिंह हे फॉर्म्युलेशनचे संरक्षक आहे. याबाबत सिंह यांनी सांगितले की, हे एक गुपित आहे. निवडणुकीच्या शाईवर कधीही पेटंट घेतले गेले नाही. ते गोपनियतेसाठी ठेवले जाईल. हे रहस्य १९६२ पासून उघड झालेले नाही.

१९६२ मध्ये देशात तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हापासून ही निवडणूक शाई वापरली जाऊ लागली.ही खूण नखावर आठवडाभर राहते.या शाईपासून त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही, असं सांगितले जातात.

Voting Ink
Assembly Election: 'काम भारी, लुटली तिजोरी'; शिंदे गटाच्या होर्डिंगवरून उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला

दक्षिण भारतातील एका कंपनीत ही शाई तयाकर केली जाते.म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड नावाची कंपनी ही शाई तयार करते. ही शाई १९६२ मध्ये परवाना आणि शाईची माहिती म्हैसूर पेंट्स आणि वार्निश लिमिटेड कंपनीतडे हस्तांतरिक केली गेली.

MVPL कोणत्या देशांना शाई पुरवते?

MVPL ही निळी शाई मलेशिया, कॅनडा, घाना, आव्हरी कोस्ट, अफगाणिस्तान, तुर्की, नायजेरिया, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, मादागास्कर, नायजेरिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, मंगोलिया यासह ३५ देशांमध्ये निर्यात केली जाते.

Voting Ink
Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com